काँग्रेसकडून ‘मविआ’मध्ये दहा जण भांडणार; खर्गेंनी तयार केली तगडी फौज

काँग्रेसकडून ‘मविआ’मध्ये दहा जण भांडणार; खर्गेंनी तयार केली तगडी फौज

Mallikarjun Kharge Make committee for Maharashtra Assembly Election : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Election) जाहीर होतील. या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रादेशिक पक्षांसह राष्ट्रीय पक्ष देखील जोरदार कामाला लागले आहेत. त्यातच आता महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून देखील निवडणुकांच्या जागांच्या वाटाघाटीसाठी समिता तयार करण्यात आल्या आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांच्याकडून या संदर्भात अधिकृत पत्र जारी करण्यात आले आहे. ज्यामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आणि मुंबई प्रदेश काँग्रेस अशा दोन समित्या गठीत करण्यात आले आहेत.

Mr and Mrs Mahi: राजकुमार-जान्हवीचा ‘मिस्टर अँड मिसेस माही’च्या ओटीटी रिलीजची तारीख ठरली

समित्यांमध्ये कुणाची लागली वर्णी?

मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडून नियुक्त करण्यात आलेल्या या दोन्ही समित्यांमध्ये राज्यातील काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची वर्णी लागली आहे. ज्यामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री नितीन राऊत, आरिफ नसीम खान आणि सतेज पाटील तर मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये नुकत्याच खासदार झालेल्या वर्षा गायकवाड, भाई जगताप आणि असलम शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मविआकडून मुख्यमंत्रीपदासाठी कोणाला मिळणार संधी?

दरम्यान तर आगामी विधानसभा निवडणुकीत तिन्ही पक्ष जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी धडपड करत असल्याने जागावाटपासह महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री पदासाठी चेहरा कोण असणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. यामध्ये काही दिवसापूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवण्यात यावा असं म्हटले होते. दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नावाची देखील मुख्यमंत्रिपदाचा चेहऱ्यासाठी चर्चा होत आहे.

सुनील केदारांना ‘सुप्रीम’ धक्का; नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याच्या शिक्षेविरोधातील याचिका फेटाळली

दुसरीकडे राज्याच्या राजकारणात आज देखील शरद पवारच (Sharad Pawar) किंग असल्याचे लोकसभा निवडणुकीत दिसून आलंय. त्यामुळे त्यांच्यासाठी विधानसभा निवडणूक काही नवीन नाही. यावेळी देखील शरद पवार जास्तीत जास्त जागा जिंकून पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार हे मात्र निश्चित आहे आणि यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटील यांना मुख्यमंत्री पदासाठी संधी मिळू शकते असं राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube