CM शिंदे अन् पवार-फडणवीसांनी मराठ्यांना उचकवायला लावलं! जरांगेचा सर्वात मोठा आरोप
जालना : मराठा समाजाला आता आरक्षण मिळवून द्यायचं आहे. त्यासाठी गावा गावातल्या, तालुक्यात तालुक्यातल्या, जिल्ह्यात जिल्ह्यातल्या मराठ्यांनो सगळे सावध राहा. कोणीही शांत बसू नका. आता मराठ्यांना आलेली संधी वाया जाऊ द्यायची नाही. मराठा आता एकजूट झाला आहे. आपल्या फूट पाडण्याचा प्रयत्न होईल. हे छगन भुजबळ आणि गुणरत्न सदावर्ते हे कशामुळे बोलतात माहित आहे का? यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं असा अंदाज आहे की, तुम्ही मराठ्यांना उचकावा, म्हणजे मराठे रागीट आहेत, ते काही तरी करतील आणि त्या नावाखाली आपण मराठ्यांना आरक्षण देणार नाही, असा डाव आहे, असा गंभीर आरोप मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला. (Manoj Jarange made serious allegations against Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis and Ajit Pawar over the Maratha reservation movement.)
मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला दिलेल्या 40 दिवसांच्या मुदतीमधील 10 दिवस शिल्लक असतानाच आज (13 ऑक्टोबर) आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी लाखोंच्या उपस्थितीमध्ये मराठा समाजातील बांधव उपस्थित होते .छगन भुजबळ यांनी सभेच्या खर्चावरून संताप व्यक्त करत जरांगे पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली होती. तर मनोज जरांगे यांना अटक करा अशी मागणी अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी केली होती. त्यावर उत्तर देताना मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री शिंदेंसह उपमुख्यमंत्री फडणवीस आणि पवार यांच्यावर जोरदार टीका केली.
पुण्याच्या बदल्यात बारामती! अजितदादा-भाजपमधील डील चंद्रकांतदादांनी फोडली
भुजबळांना आवर घाला : अजित पवारांना विनंती
जरांगे पाटील म्हणाले, मंत्री छगन भुजबळांना आवर घाला, अशी विनंती अजित पवार यांना करतो छगन भुजबळांना समज द्या, माझ्या नादाला लागले तर काही खरं नाही. माझा मराठा आरक्षणाला विरोध नाही म्हणणारे भुजबळ आता विरोधात बोलत आहेत. ते आता फडफड करत आहेत. सभेला सात कोटी खर्च आल्याचे छगन भुजबळ म्हणाले. मात्र सभेसाठी शंभर एकर जमीन शेतकऱ्याने फुकट दिली. येऊन विचार असे जरांगे पाटील म्हणाले.
पाच हजार पुरावे मिळाले, समितीचं काम बंद करून आरक्षण द्या; जरांगे पाटलांनी ठणकावलं !
पाच हजार पुरावे मिळाले, समितीचे काम बंद करुन आरक्षण द्या :
जरांगे पाटील यांनी या सभेत आता दहा दिवसात सरकारने मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) दिलेच पाहिजे असा निर्वाणीचा इशारा दिला. आम्ही दहा दिवसांपेक्षा जास्त वेळ वाट पाहू शकणार नाही. पाच हजार पुरावे मिळाले आता समितीचे काम बंद करा, असे आवाहन जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला केले. दहा दिवसांनंतर जर आरक्षण दिलं नाही तर चाळीसाव्या दिवशी सांगू पुढे काय करायचं ते, पण पुढे मात्र सरकार जबाबदार राहिल, असा इशाराही त्यांनी दिला.