मराठ्यांचं आरक्षण टिकू न देण्याचा महाजनांचा प्रयत्न, पण मी जिवंत असेपर्यंत..; जरांगेची टीका

मराठ्यांचं आरक्षण टिकू न देण्याचा महाजनांचा प्रयत्न, पण मी जिवंत असेपर्यंत..; जरांगेची टीका

Manoj Jarange Patil on Girish Mahajan : सगेसोयऱ्यांच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एका महिन्याचा अल्टिमेटम दिला. मात्र, या मागणीवर मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी मोठा दावा केला. जरांगे पाटील यांचे समाधानच होत नसेल तर आम्ही काय करावं, असा सवाल करत सगेसोयऱ्यांचा कायदा कोर्टात टिकणार नाही, असं महाजन म्हणाले होते. त्यावर जरागेंनी प्रत्युत्तर दिलं.

NEET पेपर लीक प्रकरणात तेजस्वी यादव कनेक्शन, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांनी केला खबळजनक दावा 

मनोज जरांगेंनी आज माध्यमाशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. मराठा आणि कुणबी एक नसल्याचं सिध्द करावं. तिकडे माध्यमात नाहीतर माझ्यासमोर येऊन बोलावं. तिकडे गप्पा ठोकायच्या नाहीत. मराठा आणि कुणबी एक असल्याचं मी सिध्द करून देतो, असं जरांगे म्हणाले. सरसकट आरक्षण द्या, ज्यांना घ्यायचं ते घेतली. कुणालाही जबरदस्ती नाही, असंही ते म्हणाले.

पुढं बोलतांना ते म्हणाले, मराठा आणि कुणबी एकच आहेत. आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मागतो आहे. मात्र, सरकारचा सगे सोयरे आरक्षण देऊन ते उडवण्याचा डाव आहे. सरकार आरक्षण देणार आणि तेच आरक्षण देणार आहे. आरक्षण देण्याआधीच याचिका दाखल करण्यात आली होती. पुन्हा मराठ्यांना गोड बोलून डाव साधण्याचा प्रयत्न आहे. आम्ही ओबीसीतून आरक्षण घेणार अन्यथा 288 उभे करू नाहीतर 288 जणांना पाडून. मराठ्यांचं आरक्षण टिकू न देण्याची तयारी गिरीश महाजन यांनी केली आहे, असे जरांगे म्हणाले.

मी PMO कार्यालयाची राष्ट्रीय सल्लागार…सव्वा कोटींना गंडा, ‘घोटाळ’झेप घेणारी कश्मिरा पवार कोण? 

सरकारने 13 जुलैच्या आत हैदराबाद गॅझेट लागू करावं. सरकार बदलू शकते तर आम्ही का बदलू शकत नाही. न्यायमूर्ती चर्चेचसाठी आलेले तेव्हा गिरीश महाजन, सरकारचे सचिव, सात मंत्रीही उपस्थित होते. तेच महाजन आता आरक्षण टिकणारे नसल्याचे सांगत आहेत. याचा अर्थ हा डाव आहे, असा आरोप जरागेंनी केला.

सगळा अभ्यास वैगेर करूनही आरक्षण टीकणार नाही, असं म्हणत असतील तर हा नक्कीच डाव आहे. तसं असेल तर सरसकट आरक्षण द्या. मी जिवंत असेपर्यंत ओबीसींतून आरक्षण घेईन. सगे सोयरेही उडवू देणार नाही आणि मागणीही सोडणार नाही. देवेंद्र फडणवीसांना सांगायचं की, आपण असं करायचं आणि मग त्यांच्याच पेंद्यासारख्या मित्राने सांगायचं की, ते उडणार आहे. आम्ही काय कच्चे बसलो का इथं? असंही जरांगे म्हणाले.

महाजन काय म्हणाले?
आम्ही मराठा समाजाच्या बाजूने आहोत. ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता ते आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे. पण, मनोज जरांगे यांचे समाधान झाले नाही तर आता आम्ही काय करणार. सगेसोयरे यांनाही आरक्षण द्यावे, अशी त्यांची मागणी आहे. मात्र, हे न्यायालयात टिकणार नाही, असे महाजन म्हणाले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube