ब्रेकिंग : मराठा आरक्षणासाठी जरांगे पुन्हा मैदानात; 30 मे पासून आंतरवालीत आमरण उपोषण

मराठा आरक्षणासाठी जरांगेंनी पुन्हा रणशिंग फुंकलं आहे. 30 मे पासून आंतरवाली सराटीत पुन्हा आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली आहे.

  • Written By: Published:
Manoj Jarange (8)

Manoj Jarange Patil Announces Indefinite Hunger Strike : मराठा आरक्षणासाठी जरांगेंनी पुन्हा रणशिंग फुंकलं आहे. 30 मे पासून आंतरवाली सराटीत पुन्हा आमरण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली आहे. मी जर उपोषण केलं नाही तर, मराठ्यांच्या लेकरा बाळांची ऍडमिशन होणार नाही. त्यामुळे सगळ्य महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांनी अंतरवालीत 29 मे पर्यंत पोहोचण्याचे आवाहन केले आहे. या आंदोलनात 3 कोटी मराठे सामिल होतील असे देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

निशाण्यावर फडणवीस सरकार

पत्रकार परिषदेत जरांगेंनी विविध मुद्द्यांवर भाष्य करत मराठा-कुणबी प्रमाणपत्रावरून फडवीस सरकारला धारेवर धरलं.  माझं फडणवीस साहेबांबद्दल वाईट मत नाही. पण माझ्या समाजाचे वाटोळं होत असेल तर मी तुम्हाला कोणालाच मोजणार नाही. मला मराठा समाजातील लेकरांच्या चेहऱ्यावर आनंद बघायचा आहे. मी फडणवीस साहेबांना दोष देत नाही. माझं म्हणणं आहे की, तुम्ही हैदराबादचा जीआर काढला, पण प्रमाणपत्र रोखून धरली. फडणवीस साहेब तुम्ही मुख्यमंत्री असलात, तर मराठ्यांनीच केलं आहे, हे ध्यानात ठेवा. तुम्हाला वाटत असेल, मी खूप हुशार आहे. पण गोरगरीब मराठा शेतकरीही हुशार आहे. फडणवीसांना मराठ्यांनीच CM केले पण, समाजाचे वाटोळे होणार असेल तर शांत बसणार नसल्याचे सांगत आता आंदोलन असं करायचं की पुन्हा फडणवीसांना चारी दिशेला काही दिसले नाही पाहिजे. नुसते मराठेच दिसले पाहिजे असे जरांगे म्हणाले.

मनोज जरांगे पाटील यांच्या मुख्य मागण्या काय आहेत?

– मंत्रीमंडळ उपसमिती बरखास्त करा.
– सातारा संस्थान गॅजेट आरक्षणाचा जीआर काढा
– मराठवाड्यातील सगळ्या मराठ्यांना ३० मे च्या आत कुणबी प्रमाणपत्र द्यावे.
– महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावेत.
– वाटलेल्या कुणबी प्रमाणपत्रांच्या नोंदी ग्रामपंचायतीवर लावाव्यात.
– आठ महिने झाले तरीही सातारा संस्थांनाचा जीआर काढला नाही तो लवकरात लवकर काढावा.
– बलिदान केलेल्या कुटुंबातील सदस्यांना ३० मे च्या आत महावितरण आणि इतर ठिकाणी नोकरीला घेण्याचा जीआर काढावा.

follow us