“तुला सगळ्यांनी साईडलाईन केलं आहे… तु समुद्रात उडी हाणं” : जरांगेंचा भुजबळांवर पुन्हा हल्लाबोल

“तुला सगळ्यांनी साईडलाईन केलं आहे… तु समुद्रात उडी हाणं” : जरांगेंचा भुजबळांवर पुन्हा हल्लाबोल

जालना : तु राजीनामा दे नाही तर काही कर. आम्हाला काय करायचे आहे. तुझ्या एवढा ओबीसींना येड्यात काढणारा दुसरा कोणी नाही, तुला सगळ्यांनी साईडलाईन केलं आहे. पण ते तुला कळेना, अशी एकेरी भाषेत मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी ओबीसी (OBC) नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर हल्लाबोल केला. ते जालना इथे माध्यमांशी बोलत होते. (Maratha reservation activist Manoj Jarange Patil criticizes OBC leader and minister Chhagan Bhujbal)

काल (3 फेब्रुवारी) अहमदनगरमधील सभेतून छगन भुजबळ यांनी बोलताना,  आपण 16 नोव्हेंबरला राजीनामा देत 17 नोव्हेंबरपासून ओबीसींचा लढा सुरु केला होता, असा दावा करत त्यांचा राजीनामा मागणाऱ्यांना उत्तर दिले होते. तसेच जरांगे पाटील यांना अधिसूचना आणि कायदा यातील फरक तरी कळतो का, असा सवाल करत त्यांच्यावर टीका केली होती. यावर जरांगे पाटील यांनी भुजबळ यांना प्रत्युत्तर दिले.

Bharat Jodo Nyay Yatra:’भारत जोडो न्याय यात्रा’मध्ये अखिलेश यादव सामील होणार का? म्हणाले…

यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले, अधिसूचना आणि कायद्यातील फरक तु एवढा शहाणा आहे तर तुला कळतो का? आरक्षण देण्यासाठी विधानसभा अस्तित्वात असेल तर कायदा केला जातो. जर विधानसभा अस्तित्वात नसती तर राजपत्रित अधिसूचना काढावी लागते. अधिवेशन आल्यानंतर त्याचेच कायद्यात रुपांतर होते. तुला एवढं पण कळत नसेल तर कशाला मंत्री राहतो रे?

मराठे मागच्या दाराने ओबीसीमध्ये आले या टीकेवर ते म्हणाले, 2001 च्या कायद्यात जाण्यासाठी मराठे ताकदीने घुसले आहेत. तुला दार पण कळेना. मागच्या दाराने आले अन् पुढच्या दाराने आले. तु आता पडद्यामागून अधिसूचनेला आव्हान दिले आहे, फक्त ती रद्द होऊ दे मग तुला पुढचं दार अन् मागचं दार काय असतं दाखवतो. ओबीसीला कलंक आहे. तुझी नियत खराब आहे. गोरगरिब ओबीसींची वाट लावली.

रेल्वे विभागात 5996 पदांसाठी भरती, महिन्याला 19 हजार रुपये पगार, कधीपर्यंत करता येणार अर्ज?

आता जर अधिसुचनेला काय झाले तर मंडल कमीशन उडालाच म्हणून समज, तुझ्या एकट्यामुळेच ओबीसी आरक्षण रद्द होईल. पण आम्हाला ओबीसींचे नुकसान करायचे नाही, त्यांचे वाटोळे करायचे नाही, तु राजीनामा दे नाही तर काही कर. आम्हाला काय करायचे आहे. तुझ्या एवढा ओबीसींना येड्यात काढणारा दुसरा कोणी नाही, तुला सगळ्यांनी साईडलाईन केलं आहे. पण ते तुला कळेना, असेही जरांगे पाटील म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube