शिक्षक बदली प्रक्रियेत सुरेश धस, संदीप क्षीरसागरांकडून 39 कोटींचा घोटाळा, ओबीसी नेत्याचा आरोप

शिक्षक बदली प्रक्रियेत सुरेश धस, संदीप क्षीरसागरांकडून 39 कोटींचा घोटाळा, ओबीसी नेत्याचा आरोप

Balasaheb Sanap : गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्हा सतत चर्चेत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजे असतानाच आता आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) आणि आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आलाय. बीड जिल्ह्यात 2014 साली जिल्हा परिषद शिक्षक आंतरजिल्हा बदलीमध्ये तत्कालीन मंत्री सुरेश धस, जिल्हा परिषद अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला, जिल्हा परिषद शिक्षण सभापती आमदार संदीप क्षीरसागर यांनी तब्बल 39 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी केला.

ओयोमध्ये जाण्यास आधार कार्ड सोबत नेण्याची गरज नाही, ‘अशी’ मिळणार एन्ट्री 

बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या बदली प्रकरणात प्रत्येक शिक्षकाकडून 3 लाख रुपये घेण्यात आले. 1300 हून अधिक शिक्षकांकडून पैसे घेऊन या बदल्या करण्यात आल्या होत्या, असं सानप म्हणाले. बिंदू नामावलीच्या घोटाळ्यासंदर्भात धस यांनी तक्रार केल्यानंतर हा मुद्दा चर्चेत आला.

पत्रकार परिषदेत बोलताना सानप म्हणाले की, 14 वर्षांनंतर बीड जिल्हा परिषदेत बिंदू नामावलीचा प्रश्न उद्भवला आहे. ज्यावेळी आंतरजिल्हा बदल्या सुरू होत्या, त्या काळात 2014 साली सर्व शिक्षकांनी मागणी केली होती की, बीड जिल्ह्यामध्ये आम्हाला परत यायचे आहे. त्यावेळी राज्याचे मंत्री सुरेश धस होते. जिल्हा परिषद अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला आणि संदीप क्षीरसागर हे जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती होते. त्या काळात ही भरती झाली. त्या काळात प्रत्येक व्यक्तीकडून 3 लाख रुपये घेण्यात आले. तेराशे लोकांचे तीन लाख रुपये म्हणजे, एकूण जवळपास 39 कोटी रुपयांचा घोटाळा केला, असा आरोप सानप यांनी केला.

26/11 च्या हल्ल्यात दाऊद इब्राहिमचा हात? NIA चौकशीत तेहव्वूर राणाकडून सत्य समोर… 

ते पुढे म्हणाले की, बिंदू नामावलिच्या माध्यमातून एका समाजाला टार्गेट करण्याची कामधस यांच्याकडून केलं जातेय. 2014 ते 2024 पर्यंत बिंदू नामावलीच विषय कुठेच निघाला नाही. मात्र, आता आमदार सुरेश धस हा प्रश्न उपस्थित करून जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करत आहेत. धस यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची दिशाभूल केल्याचा आरोपही सानप यांनी केला.

येत्या मंगळवारी आपण एक शिक्षकांचे शिष्टमंडळ घेऊन याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री अतुल सावे आणि ग्रामविकास मंत्री यांची भेट घेईल, असं सानप म्हणाले. जागा नसतांना भरती करून घोटाळा करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही सानप यांनी केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube