…तर संतोष देशमुखपेक्षा वाईट हाल केले असते; सुदर्शन घुलेची महादेवी गीतेला धमकी, मीरा गीतेंचा दावा

Beed News : काही दिवसांपूर्वीच बीडमधील केज कारागृहात महादेव गीते (Mahadev Gite) आणि वाल्मिक कराड टोळीमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली. त्यानंतर कराडच्या टोळीकडून महादेव गीतेला मारहाण झाल्याचा आरोपी पत्नी मीरा गीते यांनी केला होता. आता जेलमध्येच सुदर्शन घुलेने महादेव गीतेला धमकी दिल्याचा आरोप पत्नी मीरा गीतेकडून करण्यात आलायं.
शेअर बाजारात ऐतिहासिक घसरण, एकाच दिवसात 13.4 लाख कोटी बुडाले, चक्क 543 शेअर्सना लोअर सर्किट
बाहेर भेटला असता तर संतोष देशमुखपेक्षा वाईट हाल केले असते अशी धमकी सुदर्शन घुलेने महादेव गीतेला दिल्याचा आरोप पत्नी मीरा गीते यांनी केलायं. या प्रकरणी मीरा गीते यांनी पोलिस अधीक्षकांची भेट घेत धमकीबद्दलची माहिती दिलीयं. “आज तुम्ही आणि आम्ही ज्या ठिकाणी आहात त्यामुळे तुम्ही वाचलात नाहीतर बाहेर भेटला असता तर संतोष देशमुखपेक्षा वाईट हाल केले असते” अशी धमकी सुदर्शन घुलेने महादेव गीतेला दिली असल्याचा दावा मीरा गीते यांनी केलायं.
काही दिवसांपूर्वीच बीड कारागृहात कराड आणि गीते टोळीत मोठा राडा झालाय. बीडच्या कारागृहामध्ये वाल्मिक कराड आणि बबन गीते गँगचा महादेव गीते हे एकमेकांना भिडल्याचं समोर आलं. कराडची विरोधक टोळी असलेल्या बबन गित्ते यांच्या गॅंग मधील या जेलमध्ये असलेला आरोपी महादेव गित्ते आणि अक्षय आठवले या दोघांनी मारहाण केल्याचं समोर आला आहे. कारागृहामध्ये असलेला कायद्यांसाठीच्या फोनवरून हा वाद झाला असल्याचं सांगण्यात आलं.
दरम्यान, वाल्मीक कराड याच्या सांगण्यावरूनच आम्हाला मारहाण झाल्याचं महादेव गीते याने माध्यमांना सांगितलं. ते मारहाणीच्या घटनेनंतर बीड कारागृहातून महादेव गीते याच्यासह चार आरोपींची हरसुल कारागृहात रवानगी करण्यात आली त्यावेळी त्याने माध्यमांना प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न केला.