नाशिक लोकसभेबाबात मुख्यमंत्री शिंदेंनी थेटच सांगितलं! म्हणाले, शिवसेनेची पारंपारिक जागा

नाशिक लोकसभेबाबात मुख्यमंत्री शिंदेंनी थेटच सांगितलं!  म्हणाले, शिवसेनेची पारंपारिक जागा

Eknath Shinde :  नाशिक लोकसभा मतदार संघावरून आणखी राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना यांच्यात दावे प्रतिदावे सुरूच आहेत. छगन भुजबळांनी माघर घेतली आहे. तर, शिवसेनेचे काही नेते त्यावर दावा करत आहेत. दरम्यान आज, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले की, नाशिकची जागा शिवसेना लढवणार आहे. (Uddhav Thackeray)  नाशिक ही पारंपारिक शिवसेनेची जागा आहे. (Sandipan Bhumre)त्यामुळे नाशिकच्या जागेचा निर्णय महायुतीत समन्वयाने होईल असं शिंदे म्हणाले आहेत. त्यामुळे महायुतीतील विसंवाद पुन्हा एकदा समोर आला आहे. ते (Sambhajinagar Loksabha) छत्रपती संभाजीनगर येथे आयोजीत पत्रकार परिषदेत बोलत होते.  यावेळी डॉ. भागवत कराड, महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे उपस्थित होते.

 

पवारांवर टीका

राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आहे. परंतु, उद्धव ठाकरे यांची टीका करण्याची पातळी घसरली आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदे यांनी टीका केली आहे. तसंच, सरडा रंग बदलतो. परंतु, इतक्या वेगात रंग बदणारा सरडा कुणी पाहिला नाही अशी टीकाही शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.  दरम्यान, शिंदे यांनी शरद पवारांवरही टीका केली आहे. शिंदे म्हणाले, आता पवार एमएसपी देण्याची मागणी करतात. परंतु, पवार 10 वर्ष कृषी मंत्री असताना काय केलं? असा प्रश्नही शिंदे यांनी उपस्थित केला.

 

एकनाथ शिंदेंचे मंत्री संदीपान भुमरेही कोट्याधीश; चार वर्षांत भरघोस संपत्ती वाढली!

घरात बसून सरकार चालत नाही

लोकांना काम करणारं सरकार पाहिजे. काम बंद करणार सरकार नकोय असं म्हणत लोक तुम्हाला तुमची जागा दाखवतील असंही शिंदे यावेळी म्हणाले आहेत. तसंच, मुस्लिम समाजाचा फक्त आजपर्यंत वापर झाला आहे. यांनी यांच्या काळात मुस्लि समाजाला काय दिलं असा प्रश्नही उपस्थित केला आहे. तसंच, घरात बसून सरकार चालत नाही असा टोलाही शिंदे यांनी ठाकरे यांना लगावला आहे. दरम्यान, कडक उन्हाळ्यातही लोक सभेला करतात. याचा अर्थ आमचे उमेदवार संदिपान भुमरे यांचा विजय करण्याचा संकल्प संभाजीनगर जिल्ह्यातील जनतेने केला असल्याचा विश्वासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

 

संभाजीनगरच्या खासदाराने राम मंदिराला समर्थन केलं होतं का? फडणवीसांचा थेट सवाल

आम्ही फेसबूक लाईव्ह करणारे नाहीत

पंतप्रदान नरेंद्र मोदी देशभरात प्रचारासाठी फिरतात. आम्हाला एक-एक जागा महत्वाची आहे. त्यासाठी आम्ही रोज प्रचारासाठी फिरतो. तसंच, आम्ही प्रत्येक मतदारसंघात जाणार आहोत. ज्या ठिकाणी आमचा उमेदवार आहे त्या ठिकाणी आम्ही प्रचार करणार आहोत. आम्ही घरात बसून फेसबूक लाईव्ह करणारे नाहीत असंही शिंदे यावेळी म्हणाले. त्याचबरोबर, ज्या ठिकाणी पाण्याचा तुटवडा आहे. जिथे नुकसान झालं आहे या सर्व गोष्टींची माहिती घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. ज्या ठिकाणी चारा- पाणी याचा प्रश्न आहे तो आम्ही सोडवणार आहोत. कारण निवडणुका येतात आणि जातात. परंतु शेतकरी जगला पाहिजे असंही शिंदे यावेळी म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube