धनंजय मुंडेंचं मंत्रिपद जाणार? बीडचे जिल्हाधिकारी चौकशीची कागदपत्रे घेऊन मुंबईत

  • Written By: Published:
धनंजय मुंडेंचं मंत्रिपद जाणार? बीडचे जिल्हाधिकारी चौकशीची कागदपत्रे घेऊन मुंबईत

Collector Avinash Pathak Met Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बीडचे पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर झालेल्या पहिल्या डीपीडीसी बैठकीत मंत्री धनंजय मुंडेंनी (Dhananjay Munde) परळीत बोगस कामे करून ७३ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी केला. धस यांच्या या आरोपानंतर आता अजित पवार अॅक्शनमोडमध्ये आले. अजित पवारांनी जिल्हाधिकाऱ्यांना कागदपत्रांसह तातडीने मुंबईला बोलावून घेतलं. त्यामुळं मंत्री धनंजय मुंडेंचं मंत्रीपद जाणार असल्याची चर्चा सुरू झाली.

अवघ्या दोन महिन्यांनी होणार होते विवाहबद्ध; जम्मूमध्ये स्फोटात दोन जवान शहीद! 

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सातत्यानं होतंय. अशातच अजित पवार यांनी पालकमंत्रिपद स्वीकारल्यानंतर ता. ३० जानेवारीला जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली. या बैठकीत परळीत बोगस कामे करून मुंडेंनी ७३ कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला होता. तसेच बीड जिल्हा नियोजन समितीन्या निधी वाटपात दुजाभाव झाला. निधी वाटपात अनियमितता झाल्याचा आरोपही धस यांनी केला.

दरम्यान, अजित पवारांनी नियोजन समितीची बैठक होताच जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष पथक गठीत होती.

ट्रम्प यांचा दणका.. कंगाल झाले शेअर बाजारातील महारथी, 40 दिवसात बुडाले हजारो करोडो रुपये 

अजित पवार यांनी मागच्या दोन वर्षांमध्ये झालेल्या ८७७ कोटी रुपयांच्या निधीची चौकशी लावली. यासाठी तीन सदस्यीय चौकशी समिती गठीत करण्यात आली. प्रशासकीय मान्यतेची चौकशी करण्यासाठी गठीत झालेल्या समितीद्वारे बीडमधील मंजूर झालेल्या कामांची सद्यस्थिती, त्या कामांना दिलेली तांत्रिक मान्यता आणि कार्यारंभ आदेश तसेच प्रशासकीय मान्यता दिलेली कामे, त्याकरिता निधी वितरण याबाबत चौकशी केला जात आहे.

अविनाश पाठकांनी घेतली अजित पवारांची भेट

दरम्यान, बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक आणि जिल्हा नियोजन अधिकारी डॉ. चिंचाणे यांना अजित पवारांनी मुंबईच्या कार्यालयात चौकशीच्या कागदपत्रांसह बोलाविण्यात आल होतं. आज जिल्हाधिकारी पाठक आणि जिल्हा नियोजन अधिकारी चिंचाणे यांनी मुंबईत अजित पवारांची भेट घेतली. या बैठकीत आतापर्यंत झालेल्या चौकशीचा आढावा अजित पवारांनी घेतला. जिल्हाधिकाऱ्यांनी भेटीत चौकशीची कागदपत्रे देखील अजित पवारांकडे सोपलल्याची माहिती आहे. मात्र, जिल्हाधिकारी पाठक आणि अजित पवार यांच्यात काय चर्चा झाली? या चौकशी अहवालात काय समोर आलं? याची माहिती अद्याप समोर आली नाही.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube