दुष्काळी बीडमध्ये अधिकाऱ्यांची चांदी; लाचखोर अधिकाऱ्याकडे सापडले कोटींचे घबाड !

  • Written By: Published:
दुष्काळी बीडमध्ये अधिकाऱ्यांची चांदी; लाचखोर अधिकाऱ्याकडे सापडले कोटींचे घबाड !

बीडः बीड (Beed) जिल्ह्यात सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. या परिस्थितीमुळे बीडकरांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. परंतु याच बीडमध्ये गेल्या आठवड्याभरात दोन अधिकारी लाचेच्या जाळ्यात अडकले आहेत. या दोन्ही अधिकाऱ्यांकडे कोट्यवधींची संपत्ती आढळून आली आहे. पोलिस निरीक्षक आणि पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंताकडे कोट्यवधींचे घबाड आढळून आले आहे. (Crores of money found with the bribe-taking officer)

गेल्या आठवड्यात पतसंस्था चालविणाऱ्या व्यक्तीकडे कारवाई न करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे याने एक कोटींची लाच मागितली होती. तीस लाख रुपये घेताना खाडे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau) जेरबंद केले होते. या अधिकाऱ्याच्या घरझडतीमध्ये कोट्यवधींची संपत्ती एसीबीला आढळून आली आहे. ही कारवाई ताजी असतानाच माजलगाव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश सलगरकर (Rajesh Salgarkar) याला 28 हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले होते.

…अन् भर मंचावर मंत्री विखेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी

ही कारवाई चार दिवसांपूर्वी झाली होती. सध्या राजेश सलगरकर हा जामिनावर आहे. सलगरकर याचे सांगलीतील मिरज येथील युनियन बँक इंडियाच्या शाखेत लॉकर होते. या लॉकरची तपासणी एसीबीने केली आहे. त्यात लॉकरमध्ये अकरा लाख रुपये रोकड, दोन किलो सोने, चांदीचे दागिने व बिस्किट आढळून आले आहे. लॉकरमध्ये तब्बल 1 कोटी 61 लाखांचा एेवज एसीबीने जप्त केला आहे. त्यापूर्वी सलगर याच्या परळी येथील घरातूनही 21 लाख रुपयांची रोकड आढळून आली होती. या अधिकाऱ्याकडे आतापर्यंत पावणेदोन कोटींची संपत्ती आढळून आली आहे.
सुरुवातीला 35 हजारांची मागणी, 28 हजार घेताना अटक

प्रांतधिकाऱ्यांना पुणे जिल्ह्याधिकाऱ्यांचे जैसे-तैसे उत्तर, आरोपांचे कारणही आले समोर

गाळ काढण्याची परवानगी देण्यासाठी मागितली लाच
सध्या तलाव कोरडेठाक पडलेले आहेत. चिंतोटी तलावातील गाळ आणि माती काढून शेतात टाकण्यासाठी काही जणांना कार्यकारी अभियंता सलगरकडे परवानगी मागितली होती. सलगर याने सात शेतकऱ्यांकडे पाच हजार रुपयांप्रमाणे 35 हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीनंतर या शेतकऱ्यांनी 28 हजार रुपयांची तयारी दाखविली होती. परंतु लाच न देता शेतकऱ्यांनी एसीबीकडे तक्रार केली. त्यानंतर सलगर हा लाचेच्या जाळ्यात अडकला.

बँकेच्या लॉकरमध्ये काय-काय आढळले

रोकड-11 लाख 89 हजार
सोने-2 किलो 105 ग्रॅम-7 सोन्याची एक किलो वजनाची बिस्किटे, इतर सोन्याचे दागिने-किंमत 1 कोटी 50 लाख

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज