त्या मुलांचे आई वडिल नाहीत; निर्दयी मातेचं क्रूर कृत्य, मुलांना बसमध्ये बसवून झाली फरार

कुठल्याही पालकांनी आपल्या मुलांना असं रस्त्यावर टाकू नये, शासनाची सक्षम यंत्रणा आहे. सं बालकल्याण समितीचे अध्यक्ष अशोक तांगडे म्हणाले आहेत.

News Photo   2026 05 20T140145.262

बीडमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. (Beed) यांचे आई-वडील नाहीत, यांना यवतमाळ बसमध्ये पाठवा अशी चिठ्ठी खिशात टाकून प्रियकरासाठी पोटच्या दोन चिमुरड्यांना धावत्या बसमध्ये सोडल्याची घटना उघडकीस आली आहे. यवतमाळच्या या निर्दयी मातेने १७ मे रोजी मुलांना तुळजापूर-संभाजीनगर बसमध्ये बसवून दिलं आणि स्वतः प्रियकरासह स्कूटी घेऊन पसार झाली.

बसमध्ये मुलं एकटीच रडत असल्याचं वाहकाच्या लक्षात येताच त्यांनी बीडच्या शिवाजीनगर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मुलांना बालकल्याण समितीसमोर हजर केलं. बालकल्याण समितीचे अध्यक्ष अशोक तांगडे यांनी मुलांच्या सुरक्षिततेसाठी त्यांची रवानगी तातडीने आर्वी येथील शिशुगृहात केली आहे.

बीडच्या आष्टीत बांधकाम विभागाचा तुघलकी कारभार; अतिक्रमण सांगून 21 गाळे पाडले, मेहबुब शेख आक्रमक

चिठ्ठीतील मजकूर काय?

त्या मातेने मुलांच्या खिशात टाकलेल्या चिठ्ठीवर लिहिलं होतं, ‘यांचे आई-वडील नाहीत, यांना यवतमाळ बसमध्ये पाठवा. अशोकनगर पटीपुरा, शारदा चौक यवतमाळ यांना सुखरूप पोहोचवा. या चिठ्ठीवर तिने मुलांच्या आजोबांचा (आईचे वडील) मोबाइल नंबर लिहिला होता.

आजोबांना नातवांपेक्षा ‘स्कूटी’चीच काळजी

चिठ्ठीवरील नंबरवरून पोलिसांनी १८ मे रोजी मुलांच्या आजोबांना बीडमध्ये बोलावून घेतलं. मात्र, बीडमध्ये आल्यानंतर नातवांना छातीशी कवटाळण्याऐवजी, या आजोबाने पोलीस आणि प्रशासनाकडं मुलीने पळवून नेलेली स्कूटी, मोबाइल आणि रोख २० हजार रकमेचीच चौकशी सुरू केली. आजोबाच्या या वागण्याने उपस्थित अधिकारीही अवाक् झाले.

शासनाची सक्षम यंत्रणा आहे

कुठल्याही पालकांनी आपल्या मुलांना असं रस्त्यावर टाकू नये, शासनाची सक्षम यंत्रणा आहे. बालकल्याण समिती, बाल संरक्षण अधिकारी, किंवा १०९८ वर फोन करून बालकांना शासनाच्या सक्षम यंत्रणेच्या स्वाधीन करावं असं बालकल्याण समितीचे अध्यक्ष अशोक तांगडे म्हणाले आहेत. दरम्यान, मुलांची माहिती मिळताच ताब्यात घेत आधार दिला. त्यांना बालकल्याण समितीसमोर हजर करून पुढील कायदेशीर कार्यवाही केली जात आहे असं पोलीस निरीक्षण प्रवीणकुमार बांगर म्हणाले.

follow us