Manisha Bidve Murder : दोन दिवस मृतदेहासोबतच राहिला, जेवणंही समोरच केलं…

Kalamb Crime : बहुचर्चित मनिषा बिडवे (Manisha Bidve Murder) हत्या प्रकरणी नवनवीन खुलासे समोर येत आहेत. मनिषा बिडवे यांची हत्या केल्यानंतर आरोपी दोन दिवस मृतदेहासोबतच राहिले असून मृतदेहासमोरच जेवणंही केल्याची धक्कादायक माहिती समोर आलीयं. या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून रामेश्वर भोसले आणि उस्मान गुलाब सय्यद अशी या आरोपींची नावे आहेत.
कळंबमध्ये मनीषा कारभारी बिडवे या महिलेची कळंब शहरातील द्वारका नगरी वसाहतीत हत्या करण्यात आल्याचे समोर आले .दोन आरोपींना अटक झाली असून आरोपींनी हत्येची कबुलीही दिली . यातून समोर आलेल्या धक्कादायक खुलाशात हत्या करून आरोपी महिलेच्या मृतदेहासोबत त्याच खोलीत दोन दिवस झोपला अशी थरारक माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
अनैतिक संबंधाच्या गुन्ह्यात संतोष देशमुखांना अडकवण्याचा प्लॅन; कुणी अन् कसा रचला सापळा?
मृतदेहा शेजारीच बसून त्यांना जेवणही केलं मात्र तीन दिवसानंतर मृतदेहाचा वास येऊ लागल्याने महिलेची बॉडी घेऊन तो बाहेर पडला .रामेश्वर भोसले हा मृत महिला मनीषा बिडवे यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करायचा .अशी माहिती आत्तापर्यंत समोर आली होती .आता या महिलेच्या हत्येबाबत मोठा खुलासा करण्यात आलाय .या महिलेची हत्या अनैतिक संबंध आणि पैशाच्या वादातून झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे
दरम्यान, मनीषा बीडवेची हत्या केल्यानंतर हाच आरोपी रामेश्वर भोसले त्याच घरात मृतदेहासोबत तब्बल 2 दिवस राहिला. तसंच मृतदेहाच्या शेजारी बसून त्याने जेवण देखील केलं असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर तिसऱ्या दिवशी मृतदेहाचा वास येऊ लागल्यानंतर तो महिलेची गाडी घेऊन् बाहेर पडला. त्यानंतर आपल्या केजमधल्या मित्राला घटनास्थळी बोलावून रामेश्वरने हा मृतदेह दाखवला. रामेश्वर भोसले हा मृत मनीषा बीडवे यांचा ड्राइव्हर म्हणून काम करायचा. तर आक्षेपार्य व्हिडिओ आणि फोटो काढून ही महिला आरोपीला त्रास देत होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.