Manoj Jarange: कधीच न भेटणारेही पाठिंब्याचं पत्र घेऊन येतात; आमचं सर्वांकडं लक्ष -जरांगे

Manoj Jarange: कधीच न भेटणारेही पाठिंब्याचं पत्र घेऊन येतात; आमचं सर्वांकडं लक्ष -जरांगे

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे आणि सध्या आरक्षणाच्या संदर्भाने सरकारने सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे सहा दिवस उपोषण केल्यानंतर मनोज जरांगे पाटील सध्या उपचार घेत आहेत. (Manoj Jarange) त्यांच्यावर छत्रपती संभाजी नगरमधील गॅलेक्सी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. (Maratha Reservation) आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

समाजाचं लक्ष आहे   एसआयटी चौकशी रद्द केली फक्त शेंगा हाणल्या; जरांगेंचा पुन्हा देवेंद्र फडणवीसांवर संशय

जरांगे पाटील म्हणाले, आम्ही सरकारला वेळ दिलाय. तो वेळे १३ तारखेपर्यंतचा वेळ आहे. तोपर्यंत आम्ही वाट पाहणार आहोत. ज्यांनी यापूर्वी कधी भेट दिली नव्हती ते सगळे सध्या माझ्याकडे येत आहेत. आजी-माजी खासदार, आमदार हे पाठिंब्याचं पत्र घेऊन येत आहेत. त्यामुळे समाजाचं लक्ष आहे कोण येतंय आणि कोण येत नाही असंही जरांगे पाटील यावेळी म्हणाले आहेत.

अपेक्षा ठेवणं आंदोलकाचं काम

हा विजय मराठा समाजाच्या एकजुटीचा आहे. समाजाची यांना गरज आहे. सर्वांकडूनच अपेक्षा ठेवणं आंदोलकाचं काम असतं. माझा मराठ्यांच्या एकजुटीवर आणि चळवळीवर विश्वास आहे त्यामुळे सध्या कोण येतंय आणि कोण येत नाही, याकडं आमचं लक्ष असल्याचंही ते म्हणाले आहेत.

ओबीसींसाठी उपोषण गड आला पण सिंह गेला; विधानसभेला फिनिक्स भरारी घेऊ, अंबादास दानवे, खैरेंची आढावा बैठक

राज्य सरकारने लोकसभा निवडणुकीच्या अगोदर सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना काढलेली आहे. त्या अधिसूचनेचं कायद्यामध्ये रुपांतर करावं आणि मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्यावं, अशी मागणी मनोज जरांगे यांची आहे. तर, दुसरीकडे ओबीसींच्या हक्कासाठी जालन्यातच राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरु आहे. रविवारी दुपारच्या दरम्यान त्यांची प्रकृती खालावली होती. परंतु, त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज