Maratha Reservation : बापाच्या लढ्यात लेकीची साथ! जरांगेंची मुलगी म्हणाली, पप्पा हट्टी, माघार घेणारे नाही
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे यांच्या नेतृत्त्वाखाली आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू आहे. या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर त्याचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. त्यात जरांगे त्यांच्या भूमिकेवर ठाम असून ते जोवर आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. त्यात आता जरांगे यांचं कुटुंब देखील मैदानात उतरलं आहे. त्यांचे आई-वडील, पत्नी, मुलगी यांनी त्यांना पाठिंबा देत आंदोलन सुरू ठेवण्यासाठी धैर्य दिलं आहे. तिन जणू हुंकारच दिला आहे.
Maratha Reservation : ढंपर भरुन पुरावे तयार; कागदपत्र घेवून तातडीने अध्यादेश काढावा : मनोज जरांगे
काय म्हणाली मनोज जरांगेंची मुलगी?
आपल्या वडीलांच्या या मराठा आरक्षणासाठीच्या (Maratha Reservation) लढ्यामध्ये मनोज जरांगे यांची मुलगी वडीलांसोबत खंबीर उभी असल्याचं दिसत आहे. कारण तीने याविषयी बोलताना त्यांना पाठिंबा देत आंदोलन सुरू ठेवण्यासाठी धैर्य दिलं आहे. तिन जणू हुंकारच दिला आहे. ती म्हणाली पप्पा हट्टी आहेत. ते माघार घेणारे नाहीत. मात्र त्यांची तब्बेत खालावली आहे. त्यामुळे त्याना काही झालं तर त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल. पण पप्पा तुम्ही आरक्षण मिळाल्या शिवाय उठून नका. आरक्षण घेऊनच घरी परत या असा संदेश जरांगे यांच्या लेकीने दिला आहे. त्यामुळे आपल्या वडीलांचं धैर्य वाढवणाऱ्या या मुलीच सर्वत्र कौतुक होत आहे.
Raghav Chadha परिणीती चोप्रा यांच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेची पहिली झलक पाहिलात का?
जरांगेंचं अख्ख कुटुंब त्यांच्या पाठीशी…
यावेळी त्यांच्या पत्नीशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या याच पार्श्वभूमीवर त्यांच्या पत्नीशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्या खूप भावनीक झाल्या. त्यांनी सरकारला आता विनंती केली आहे कि आता आरक्षण द्या मला माझ्या धन्या कडे पाहाता सुद्धा येत नाही आहे, त्यांची प्रकृती खूपच खालावत चालली आहे. तसेच त्यांच्या वडिलांनी देखील मुलाच्या या लढ्याला खंबीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मनोज एकटे नाही तर . त्यांचे आई-वडील, पत्नी, मुलगी यांनी त्यांना पाठिंबा देत आंदोलन सुरू ठेवण्यासाठी धैर्य दिलं आहे.
उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळाली आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. मागील आठ दिवसांपासून ते उपोषणावर आहेत. या काळात त्यांच्या पोटात अन्नाचा एक कणही गेलेला नाही. यामुळे आता त्यांची तब्येत बिघडली आहे. आज डॉक्टरांचे पथक उपोषणस्थळी दाखल झाले होते.