24 डिसेंबरपर्यंत आरक्षण दिले नाहीतर…? मनोज जरांगेंनी जाहीर केली भूमिका
Manoj Jarange Patil : कायद्याच्या पदावरुन बसलेले असताना येवल्याचा तो माणूस मराठा सामाजाचे (Marath Reservation) वाटोळे करायला निघालाय. कायदा पायदळी तुडवायला लागला. जातीजातीत तेढ निर्माण केला जातोय. तो एकटाच आहे. बाकीच्यांना दोष देऊ नका. ते बिचारे नाईलाजाने येतात. परंतु त्या व्यक्तीला जातीय तेढ निर्माण करुन दंगली भडकवायच्या आहेत. मराठा समाजाने त्याचे हे स्वप्न पूर्ण करुन द्यायचे नाही. जाती जातीत वाद होतील असे काही करायचे नाही. आपण शांतते राहा. एकदा आरक्षण मिळू द्या, त्याचा हिशोब पुरा करायचा, असा हल्लाबोल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर केला.
मनोज जरांगे यांनी नांदेड येथे जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी मराठा समाजाला ओबीसी मध्ये समावेश करण्यासाठी कायदा करा, असे अवाहन राज्य सरकारला केले. ते पुढं म्हणाले की, 75 वर्षात जे आयोग आणि समिती झाल्या, त्या समित्यांनी मराठ्यांचे पुरावे शोधले पण काही नेत्यांचा सरकारवर दबाव होता. येवल्यांच्या नेत्यांसारखा, अशी टीका मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर केली.
‘राऊत बळीचा बकरा’, ‘मी बकरा नाही वाघ’; नीलम गोऱ्हेंना राऊतांनी पद्धतशीर सांगितलं
मराठा समाजाच्या नोंदी असतानाही यांनी नाही म्हणून सांगितले. पुरावे असूनही बुडाखाली लपून ठेवले. आणि मराठा समाजाला सांगितले की तुमचे पुरावे नाहीत म्हणून तुम्हाला आरक्षण देता येत नाही. मराठा समाज अतिविश्वासू असल्याने त्यांनी डोळे झाकून विश्वास ठेवला. आणि इथं मराठा समाजाचा घात झाला, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.
दिल्लीतील राजकारण तापले, राहुल गांधींनी अचानक रद्द केला परदेश दौरा
आपले आणि सरकारचे ठरले आहे की मिळालेल्या नोदींनुसार कायदा तयार करु. कायदा पारीत करण्यासाठी आधार लागतो. मिळालेल्या नोदींच्या आधारे मराठा आणि कुणबी एकच आहेत. त्यामुळे सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. येत्या 24 डिसेंबरला कायदा पारीत होणार आणि आरक्षण मिळणार आहे. पण सरकारने 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण दिले नाही तर संपूर्ण मराठा समाज मुंबईत येईल. सरकारने ह्या सभा गंभीरपणे घ्याव्यात, असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे.