Maratha Reservation : ‘राजीनाम्याचं मला सांगण्यापेक्षा CM शिंदेंना सांगा’; गुलाबराव पाटलांची ‘ती’ ऑडिओ क्लिप व्हायरल

Maratha Reservation : ‘राजीनाम्याचं मला सांगण्यापेक्षा CM शिंदेंना सांगा’; गुलाबराव पाटलांची ‘ती’ ऑडिओ क्लिप व्हायरल

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगलाच तापल्याचं दिसून येत आहे, जालन्यातील मराठा आंदोलक मनोज जरांगे(Manoj Jarange) यांच्या आमरण उपोषणाचा आजचा नववा दिवस असून अद्यापही मराठा आरक्षणावर राज्य सरकारने तोडगा काढलेला नाही. अशातच आता शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री गुलाबराव पाटलांना एका संतप्त मराठा आंदोलक रमेश पाटील यांनी फोन करुन राजीनामा देण्याची मागणी केली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये मराठा आंदोलक आणि गुलाबराव पाटलांमध्ये(Gulabrao Patil) चांगलंच वाकयुद्ध झाल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, सध्या ही ऑडिओ क्लिप समाजमाध्यमांवर चांगलीच चर्चेत आली आहे.

रोमहर्षक सामन्यात अफगाणिस्तानचा 2 धावांनी पराभव, श्रीलंका सुपर-4 मध्ये दाखल

मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलेला असताना शिंदे गटाची मुलूख मैदानी तोफ मानले जाणारे मंत्री गुलाबराव पाटील यांनी अद्याप एकही अवाक्षर काढलं नाही, त्यावरच बोट ठेवत एका संतप्त आंदोलकाने थेट गुलाबराव पाटलांना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आपली भूमिका स्पष्ट करण्याबाबत सांगितलं, त्यावर गुलाबराव पाटील म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भूमिका स्पष्ट करणार होते, त्यामुळे आम्ही मराठा आरक्षणावर भाष्य केलं नाही, वरिष्ठ नेत्याने सांगितल्यानंतर आम्हाला वरिष्ठ नेत्याचं ऐकावं लागतं, माझ्याजागी तुम्ही बसून पहा मग समजेल, या शब्दांत गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Sanya Malhotra: “जवानमध्ये काम करणे…”; सान्या मल्होत्राने सांगितला अनुभव, म्हणाली…

तसेच पुढे बोलताना आंदोलकाने तुम्ही मराठा समाजासाठी राजीनामा द्या, कोणताही पक्ष सोबत नसला तरीही तुम्हाला मराठा समाज निवडून देणार असल्याची ग्वाहीच दिली, त्यावर गुलाबराव पाटील म्हणाले की, तुम्ही राजीनामा देण्याचं म्हणताय, तर चालेल पण तुम्ही राजीनाम्याबाबत मला सांगण्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगा, असं केल्यानंतर सरकार कोसळेल आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरचा मराठा समाजाचा रागही निघून जाणार असल्याचं गुलाबराव पाटलांनी खडसावून सांगितलं आहे.

दरम्यान, तुम्ही सध्या तुमच्या ज्या जागेवर आहात त्याजागी राजीनाम्याबाबत बोलणं योग्यच आहे, पण तुम्ही आमच्या जागेवर बसून पहा मग समजेल, असंही गुलाबराव पाटलांनी आंदोलनकर्त्यांला सांगितलं आहे. ही ऑडिओ क्लिप सध्या समाजमाध्यमांवर तुफान व्हायरल होत असून या ऑडिओ क्लिपची पुष्टी लेट्सअप मराठी करीत नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube