‘साहेबांना दादा कोंडकेसारखे डबल मिनिंगचे जोक्स शोभत नाहीत’; छगन भुजबळांची सडकून टीका
दादा कोंडकेसारखे डबल मिनिंगचे जोक्स तुम्हाला शोभत नसल्याची सडकून टीका मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या स्वाभिमान सभेला प्रत्युत्तर देण्यासाठी आज अजित पवार गटाची सभा बीडमध्ये पार पडली. या सभेदरम्यान, छगन भुजबळ बोलत होते.
तुमच्यासारखी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी ते जपानला गेले नव्हते, बावनकुळेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर
छगन भुजबळ म्हणाले, सगळीकडे दौरा केल्यानंतर शरद पवार आणि सुप्रिया सुळे म्हणताहेत की अजित पवार आमचे नेते आहेत, मग अजितदादा तुमचे नेते आहेत त्यांना उपमुख्यमंत्री म्हणून मान्यता द्या अन् भांडणं मिटवून टाका, आम्ही इकडे विकासासाठी आलो आहोत. फुले-शाहु-आंबेडकरांचा विचार सोडणार नाही.
गद्दारांचं सुलतानी संकट आसमानी संकटापेक्षा मोठं; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
तुम्ही काय सांगता काय बोलता हे आम्हाला कळतचं नाही, तुमच्यासोबतच्या सर्व आमदारांना विचारा सर्व आमदारांनी भाजपसोबत सामिल होण्यासाठी सह्या केल्या की नाही? तुम्हीच 2014 पासून ते आत्तापर्यंत अनेकदा सांगितलं अजितदादांना जयंत पाटलांना की, तुम्ही दिल्लीला जायचं आम्हाला एवढी मंत्रीपदे द्या, असं तुम्ही सांगत होते, मग आता काय झालं? असा खोचक सवालही त्यांनी शरद पवार यांना केला आहे.
भारतीय महिला अंध क्रिकेट टीमने रचला इतिहास, ऑस्ट्रेलियाला हरवून सुवर्णपदकावर कोरले नाव
तसेच माझ्या येवल्यात शरद पवार साहेब म्हणाले की, माझी चूक झाली भुजबळांना इथून तिकीट दिलं. तुम्हाला जर माझी मागायची असेल तर ज्या आमदारांनी सह्या केल्यात त्यांची मागा. हा रस्ताच तुम्ही दाखवला. 2019 ला पहाटेच्या शपथविधीदरम्यान तुम्ही गुगली म्हणत अन् स्वत:च्या प्लेअरला आऊट केलं, राजकारणात अशा गुगल्या असतात काय? या शब्दांत भुजबळांनी शरद पवारांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
दरम्यान, जाहीर सभांमधून कशासाठी हल्ले करीत आहात? दादा कोंडकेसारखे डबल मिनिंगचे जोक कधीपासून तुम्ही करायला लागलात. साहेब तुम्हाला हे शोभत नाही, तुमच्यापासून असं बोलायला आम्ही शिकलेलो नाही पण आता तुम्हीच असं बोलायला लागतात, बीडच्या सभेत धनंजय मुंडेंचा इतिहास बाहेर काढणं ही अपेक्षा नव्हती, असंही ते म्हणाले आहेत.