हिंमत हारु नका, तात्काळ मदत मिळवून देऊ; प्रीतम मुंडेंनी कॉल करून शेतकऱ्याला दिला दिलासा

हिंमत हारु नका, तात्काळ मदत मिळवून देऊ;  प्रीतम मुंडेंनी कॉल करून शेतकऱ्याला दिला दिलासा

MP Pritam Munden called the farmer and comforted him : राज्याच्या बहुतांश भागात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने (Unseasonal rain) धुमाकूळ घातला आहे. मराठवाड्यासह विदर्भात अनेक ठिकाणी गारपीट झाली. त्यामुळं शेती पीकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं बळीराज हताश झाला आहे. काल बीडच्या अनेक भागात अवकाळी पावसाने थैमान घातले. या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं बीड जिल्ह्यातील जवळपास शंभर गावे बाधित झाली असून पिके मातीमोल झाली आहेत. त्यामुळं एका हवालदिल शेतकऱ्याने आत्महत्या (Farmer committed suicide) करण्याचा प्रयत्न केला. ही माहिती मिळताच भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे (MP Pritam Munde) यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत या शेतकऱ्याला धीर दिला आहे.

सध्या बीडमध्ये पावसाने हाहाकार निर्माण केला आहे. जिल्ह्याभरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने पीकांना चांगलचं झोडपून काढलं आहे. यामुळं फळबागांसह पिकांचं मोठं नकुसान झालं. नदी नाल्यांना पुर आल्यामुळं जनावरही दगावली आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसानमुळे झालेल्या नुकसानीतून सावरत असतांनाच काल पुन्हा एकदा पाऊस झाला. काही दिवसांपूर्वी झालेल्या नुकसानीची अद्याप मदत मिळाली नाही. अशातच कालच्या पावसाने उरली-सुरली पीकेही नष्ट झाली. संध्याकाळपर्यंत धो धो पाऊस सुरू होता. त्यामुळं शेती पिकांचं होत्याचं नव्हतं झालं. वर्षभर ऊन-वादळ-वारा याची तमा न बाळगता मोठ्या कष्टाने घेतलेलं पीकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी बेजार झाला आहे.

Uorfi Javed : “मुस्लिमाच्या नावावर…; उर्फी जावेदच्या ‘त्या ‘व्हिडिओवर चाहते संतापले

बीडमध्ये एका शेतकऱ्याने प्रशासनाकडून होणारी हेळसांड आणि अवकाळी पाऊसाच्या संकटाला कंटाळून जीव देण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी या शेतकऱ्याशी संवाद साधत धीर देण्याचा प्रयत्न केला. या शेतकऱ्याने सांगितले की, माझं 2 एकर ज्वारीचं नुकसान झालं. ज्वारी, गहू सगळं पाण्यात गेलं. भाजीपाल्याचं नुकसान झालं. त्यामुळं जगाव तरी कसं? असा सवाल केला.

प्रीतम मुंडे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधता सांगितले की, हिंमत हारू नका, तुम्हाला तात्काळ मदत मिळवून देऊ, पण तुम्ही आत्महत्येचा विचार डोक्यातून काढून टाका, तुम्हाला मदत मिळवून देण्याची जबाबदारी माझ्यावर आहे, असे सांगत आश्वस्त केलं. प्रीतम मुंडे याणि या नुकसानग्रस्त शेतकऱ्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube