अजितदादांचं मिशन स्थानिक स्वराज्य संस्था; कार्यकर्त्यांना दिलं खास टार्गेट!

अजितदादांचं मिशन स्थानिक स्वराज्य संस्था; कार्यकर्त्यांना दिलं खास टार्गेट!

Ajit Pawar on Local Body Elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्तीत जास्त सदस्य कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करा असे सांगतानाच निवडणूका डोळ्यासमोर ठेवूनच काम करा. पल्ला लांब असला तरी दिवस पटकन निघून जातात त्यामुळे लक्षपूर्वक काम करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. गुरुवारी नांदेड जिल्ह्यातील नायगाव मतदारसंघातील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी उपस्थितांना अजित पवार यांनी (Ajit Pawar) मार्गदर्शन केले.

शिबीरामध्ये जनमानसात प्रतिमा चांगली असेल त्यानुसारच पक्षात नवीन कार्यकर्त्यांना पुढे आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत. नांदेड जिल्ह्यात आणि शहरात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करा. त्यासाठी लागणारे सर्व सहकार्य पक्षाकडून आणि सरकारकडून केले जाईल असे आश्वासनही अजित पवार यांनी दिले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने सभासद नोंदणी सुरू करण्यात आली आहे. जास्तीत जास्त सर्व घटकातील लोक कसे सहभागी होतील याकडे लक्ष द्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. विधानसभेला चांगले यश मिळाले आहे. जनतेने आपली जबाबदारी पार पाडली आहे आता आपली जबाबदारी त्यांच्या समस्या सोडवण्याची आहे.

जितेंद्र आव्हाड यांचा अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप; म्हणाले, माझी राजकीय वाढ होऊ न देण्यात..

पक्षाकडून कार्यकर्त्यांसाठी कामाचे स्वरूप तयार केले जाणार आहे. तसे कार्यक्रमही दिले जाणार आहे. आम्ही फक्त राजकारणच करत नाही तर सर्व घटकांच्या काय समस्या आहेत हेही जाणून घेत असतो. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करताना तुम्हाला आगीतून फुफाट्यात पडल्याची भावना कधीही येऊ देणार नाही असा विश्वासही अजित पवार यांनी दिला.

पक्षाची ताकद अजून कशी वाढेल यासाठी प्रयत्न करायचा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तळागाळापर्यंत कार्यकर्त्यांना ताकद देऊन उभे करायचे आहे. नांदेड जिल्ह्यात क्रियाशील सभासद नोंदणी कराल असा विश्वास व्यक्त करतानाच तुमच्या पाठीशी पक्षाची ताकद उभी केली जाईल असे आश्वासन प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले. नांदेड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील यांच्यासह सुमारे अडीचशे पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश केला.

यावेळी आमदार प्रताप चिखलीकर, आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार इद्रीस नायकवडी, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, प्रदेश सरचिटणीस लतीफ तांबोळी आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुण्याचे दादा अजित पवारच..बीडही आपल्याकडे घेत भाजपवर कसे वरचढ ठरले ?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube