Sharad Pawar : समाजात फूट पाडण्याचा राज्यकर्त्यांचा प्रयत्न; शरद पवारांचा गंभीर आरोप
Sharad Pawar : समाजात फूट पाडण्याचा राज्यकर्त्यांकडून प्रतत्न केला जात असल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी केली आहे. राष्ट्रवादीत उभी पडल्यानंतर राष्ट्रवादीचा शरद पवार गटाने आक्रमक पवित्रा घेतलायं. काल छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यानंतर आज बीडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्वाभिमानी सभेला शरद पवारांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरुन सरकारला चांगलचं धारेवर धरलं आहे.
भारतीय कफ सिरपमुळे 65 बालकांचा मृत्यू; औषधांची चाचणी टाळण्यासाठी 33 हजार डॉलरची लाच
शरद पवार म्हणाले, सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही, जनतेवर हल्ले होत आहेत, समाजात फूट पाडण्याचा राज्यकर्त्यांकडून प्रयत्न केला जात असून राज्यात कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. तसेच आजच्या सभेने जून्या काळाची आठवण झाली असल्याचंही त्यांनी यावेळी बोलून दाखवलं आहे.
Chandrashekhat Bavankule : राजकीय अस्तित्त्व अन् पक्ष टिकवण्यासाठी पवारांची मोदींवर टीका
सत्ताधाऱ्यांची समाजात अंतर वाढवण्याची निती आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, मध्यप्रदेशचं सरकार भाजपने पाडलं. लोकांनी निवडून दिलेली सरकारं पाडली जात आहेत. सत्ताधारी योग्य पद्धतीने वागत नाहीत. सत्तेचा गैरवापर करुन लोकांना जेलमध्ये डांबून राजकारण केलं जातं आहे, त्यामुळे राजकारण्यांना उलथून टाकण्यासाठी वेळ लागणार नसल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
Earthquake: नोएडामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण
शरद पवारांनी छत्रपती संभाजीनगरच्या सभेत टीका केल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे बोट दाखवण्याआधी स्वत:ची कारकीर्द तपासा, अशा खोचक शब्दांत बावनकुळे यांनी शरद पवारांवर टोलेबाजी केली होती.
दरम्यान, काल छत्रपती संभाजीनगरमध्ये शरद पवारांची सभा पार पडली. या सभेतही राष्ट्रवादीच्या नेत्यांसह शरद पवारांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेची तोफ डागल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर भाजपच्या नेत्यांकडूनही पवारांचा चांगलाच समाचार घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. आता आजही शरद पवार यांनी भाजपवर टीका केल्याने या टीकेवर भाजप नेते काय बोलणार हे पाहणं महत्वाचं ठरेल.