- Letsupp »
- marathwada
मराठवाडा
-
बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठा धक्का!
बीड – राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष जयसिंग सोळंके यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. जयसिंग सोळंके यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तृळात चर्चेला उधाण आलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोळंके कुटूंब पक्षावर नाराज असल्याची चर्चा रंगत आहे. यातच आता जयसिंग सोळंके यांनी राजीनामा दिल्यामुळे बीडच्या राजकारणात राजीनाम्याची चर्चा रंगली आहे. जयसिंग सोळंके हे आमदार प्रकाश सोळंके यांचे […]
-
फडणवीसांच्या कार्यक्रमात पुन्हा मुंडे भगिनींची दांडी, राजकीय वर्तुळात चर्चा
बीड : पाटोदा तालुक्यातील गहिनीनाथ गडावर संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम सोहळा पार पडला. या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला पहिल्यांदाच मुंडे कुटुंबियांची अनुपस्थिती पहायला मिळाली. मागील 15 दिवसांमधील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हा दुसरा बीड जिल्हा दौरा आहे. मात्र या दौऱ्यादरम्यान भाजप नेत्या पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे या दोघी बहिणींनी पाठ फिरवली. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा […]
-
भाजप नेत्याच्या पुतण्याचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
बीड : माजलगाव येथील भाजपा नेते मोहनराव जगताप यांचे पुतणे विश्वजीत जगताप यांचा रात्री बीड येथील गेवराईजवळ अपघात होऊन जागीच मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात शुक्रवारी रात्री बारा वाजेच्या दरम्यान घडला आहे. माजलगाव येथील छत्रपती नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन जीवनराव जगताप यांचे चिरंजीव विश्वजीत जगताप (वय २२) हे काही कामानिमित्त औरंगाबादला गेले होते. काम […]
-
दुसरीही मुलगीच…आईने उचललं टोकाचं पाऊल
लातूर : जन्मादात्या आईनेच तीन महिन्याच्या मुलीचा गळा घोटल्याची घटना संतापजनक घटना लातूर जिल्ह्यात घडलीय. या महिलेला पहिली मुलगी होती, दुसऱ्यांदाही तिला मुलगी झाल्याने तिने तीन महिन्याच्या बाळाची गळा दाबून हत्या केलीय. या प्रकरणी निर्दयी आईविरोधात गातेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमकं प्रकरण काय? रेखा किसन चव्हाण असं या निर्दयी आईचं नाव […]
-
बीडमध्ये गायीनं पीक खाल्ल्यानं तरुणाची विष पाजून हत्या
बीड : जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील वसंतनगर तांडा पाचेगाव येथे धक्कादायक घटना घडली आहे. घरासमोर ठेवलेले तुरीचे पीक गायीने खाल्ल्यान एकास तिघांनी मारहाण करून विष पाजले होते. त्याचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी गेवराई ठाण्यात तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहेत. विकास गणेश जाधव (वय 25. रा. वसंतनगर तांडा, पाचेगाव) असे […]
-
धक्कादायक! नायलॉन मांजानं कापला विद्यार्थ्याचा गळा
औरंगाबाद : नायलॉन मांजाच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. त्यातच औरंगाबादमधून एका विद्यार्थ्याचा नायलॉन मांजानं गळा कापल्याची घटना समोर आली आहे. नायलॉन मांजावर नियंत्रण आणण्यासाठी औरंगाबाद पोलिसांकडून विशेष पथकाची स्थापणा करण्यात आली, मात्र पथक त्यामध्ये अपयशी ठरत असल्याचं दिसून येतंय. औरंगाबादमध्ये जेवणाचा डब्बा घेऊन जात असलेल्या एका विद्यार्थ्याचा गळा नायलॉन मांजाने कापल्याची घटना समोर आलीय. […]









