Sameer Bansal : पुढच्या वर्षी NEET, JEE मध्ये पहिला रँकर बंसल क्लासेसचा

Sameer Bansal  : पुढच्या वर्षी NEET, JEE  मध्ये पहिला रँकर बंसल क्लासेसचा

लातूर : आतापर्यंत लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवणारे बंसल क्लासेस (Bansal Classes) हे अकॅडमिक्ससाठी प्रसिद्ध आहे. बंसल क्लासेस (महाराष्ट्र) चे मुख्य प्रवर्तक चंदुलालजी बियाणी (Chandulalji Biyani) यांच्या नेतृत्वाखाली बंसल क्लासेसची महाराष्ट्रातील टीम शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत आहे. पहिल्याच वर्षी NEET-2023 च्या निकालात बंसल क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व यश संपादन करून मोठी झेप घेतली आहे, असं सांगत आगामी काळात NEET, JEE मध्ये प्रथम रॅंकर बंसल क्लासेसमधूनच आणणार, असा विश्वास बंसल क्लासेसचे एमडी आणि सीईओ समीर बंसल (Sameer Bansal) यांनी व्यक्त केला. (Sameer Bansal said Bansal classes will bring first ranker in NEET, JEE)

लातूर येथील मधुमिरा फंक्शन हॉलमध्ये गुरुवारी (दि. 22 जून) बंसल क्लासेसच्या NEET-2023 मधील गुणवंतांचा आणि भावी डॉक्टरांचा यथोचित सन्मान व्हावा या उद्देशाने “महागुणगौरव सोहळा” मोठ्या धुमधडाक्यात आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी समीर बंसल बोलत होते. या कार्यक्रमाला प्रसिद्ध चित्रपट अभिनेते भरत जाधव यांच्यासह कमलाकर सातपुते, बंसल क्लासेस कोटाचे प्रिन्स सर, रवि प्रताप सिंग, स्पर्श द्विवेदी, बंसल क्लासेसचे (महाराष्ट्र) चे मुख्य प्रवर्तक चंदुलालजी बियाणी, प्रेरणदायी वक्ते जयप्रकाशजी काबरा आदी मान्यवर उपस्थित होते.

या सन्मान सोहळ्यात NEET-20320 मध्ये 720 पैकी 705 गुण मिळवणाऱ्या पलक जाजूसह निधा पटेल, पार्थ पवार, ज्ञानेश्वर कटारे, समर्थ अंबुरे, गोविंद मुंडे, सोहम सोळुंके, श्रीनाथ शिंदे, श्रेयस भोसले, सुहास थावरे आदींसह अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांच्या पालकांसमवेत गौरव करण्यात आला.

शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय, नापास झाल्यावरही मिळणार पुन्हा परीक्षेची संधी 

यावेळी अभिनेते भरत जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, या कौतुक सोहळ्याला उपस्थित राहून आनंद वाटला. कारण, हे गुणवंत विद्यार्थी मेट्रो शहरातील नसून गावागावातून आलेले विद्यार्थी आहेत. ही पिढी देशाचे भविष्य असून या विद्यार्थ्यांनी मोठ्या स्पर्धेतून आपली गुणवत्ता सिद्ध करत वेगळी छाप सोडली असल्याचं सांगत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

प्रेरणादायी वक्ते जयप्रकाशजी काबरा यांनी विद्यार्थ्यांना ‘यश कसे मिळवायचे’? याबाबत अनेक उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आज स्पर्धा तीव्र आहे, त्यामुळे ध्येयाप्रती समर्पित व्हा, कठोर परिश्रम करा, यश नक्की मिळेल, असं सांगत तुमचं ध्येय निश्चित हवं, तर यश मिळतचं हा विश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केला. तसेच या गौरव सोहळ्यात माहेश्वरी गर्जना मासिकाचेही प्रकाशन करण्यात आले. दरम्यान, अल्पावधीतच बंसल क्लासेसला महाराष्ट्रात मोठ्या उंचीवर घेऊन जाण्यात मोठी भूमिका बजावणाऱ्या बंसल क्लासेसचे (महाराष्ट्र) मुख्य प्रवर्तक चंदुलालजी बियाणी यांचा सन्मान करण्यात आला.

या महागुणगौरव सोहळ्यात गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक, बंसल क्लासेसचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी बंसल क्लासेसचे (महाराष्ट्र) मुख्य प्रवर्तक चंदुलालजी बियाणी, उपाध्यक्ष डॉ. रामेश्वर बांगड, उपाध्यक्ष कैलास घुगे, उपाध्यक्ष पूजा बियाणी, स्टेट हेड विष्णू घुगे, चिफ अॅडमिनिस्ट्रेटर राकेश चांडक, व्हाईस स्टेट हेड एस. एस. कादरी सर, व्हाईस स्टेट हेड सत्यजीत हैबते, बंसल क्लासेस लातूरचे सल्लागार सत्यनारायणजी लड्डा, संचालक कमलाकरराव कुलकर्णी, संचालक गोकुळदास चांडक, संचालक अमर मानकरी, संचालक कौस्तुभ दैठणकर, सेंटर हेड सुदर्शन गुट्टे यांच्यासह संपूर्ण बंसल क्लासेच्या टीमने परिश्रम घेतले.

बंसल क्लासेसचे live app
केमिस्ट्री विभागप्रमुख प्रिन्स सर म्हणाले की, यावर्षीची म्हणजेच NEET-2023 परीक्षा आतापर्यंत सर्वाधिक कॉम्पिटेशन असलेली होती. मात्र, बंसल क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केले आहे. दरम्यान, आगामी काळातही विद्यार्थ्यांही आपल्या ध्येयावर फोकस करा, अभ्यासातील सातत्य हेच तुम्हाला पुढे घेऊन जाईल. या प्रवासात, खूप चढ-उतार येतील मात्र, काहीही झाले तरी तुमच्या ध्येयाकडे दुर्लक्ष करू नका. विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी आम्ही “बंसल live app” या माध्यमातून फक्त ऑनलाईन शिकविणेच नाहीच मार्गदर्शनही करणार आहोत, असं सांगितलं.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube