Road Accident : दोन भीषण अपघातात 10 ठार; बीड-नगर महामार्गावरील घटना

Road Accident : दोन भीषण अपघातात 10 ठार; बीड-नगर महामार्गावरील घटना

Road Accident : राज्यातील रस्ते अपघातांची संख्या (Road Accident) काही केल्या कमी होताना दिसत नाही. आजचा बुधवार तर अपघात वार ठरताना दिसत आहे. आज दोन ठिकाणी झालेल्या भीषण अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही अपघात बीड महामार्गावर घडले आहेत. बीडहून नगरकडे जाणाऱ्या एका अॅम्ब्यूलन्सचा भीषण अपघात झाला. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. तर दुसरा अपघात मुंबईहून बीडकडे निघालेल्या ट्रॅव्हल्सला झाला. ट्रॅव्हल बस उलटल्याने सहा प्रवाशांचा मृत्यू झाला. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील अंभोरा हद्दीत दोलावडगाव येथे भरधाव वेगातील रुग्णवाहिका आणि ट्रकची जोरदार धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला.

Road Accident : दसरा मेळाव्याहून परतणाऱ्या शिवसैनिकांचा भीषण अपघात; 25 जखमी

या अपघातात चालकासह आणखी दोघांचा जागीच मृत्यू झाला तर आणखी एक जण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू पावला. या अपघातात एक जण जखमी झाला असून या जखमी रुग्णावर नगरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळता पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मदत करत जखमींना रुग्णालयात दाखल केले. या घटनेचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

ट्रॅव्हल उलटून सहा ठार 

दुसऱ्या अपघातात मुंबईवरून बीडकडे जात असलेल्या ट्रॅव्हल्स बसचा ताबा सुटल्याने आज सकाळी सहा वाजता ही बस उलटली. ही घटना आष्टी पोलीस ठाणे हद्दीतील आष्टा फाटा परिसरात घडली. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या जखमी प्रवाशांतील काही जण गंभीर अवस्थेत आहेत. त्यामुळे मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. अपघातातील जखमींना पुढील उपचारासाठी जामखेड आणि आष्टी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

रस्त्यांवर वाहनांचा वेग भरधाव असतो. त्यामुळे वाहन नियंत्रित करणे सहजासहजी शक्य होत नाही. काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातातही असेच घडले होते. रस्त्यावर अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी सातत्याने केली जात आहे. रस्त्याच्या कडेला पायी (Road Accident) जाणारी माणसेही असतात. गाव किंवा रहदारीचा परिसर आला की वाहनाचा वेग मर्यादित करणे आवश्यक असते. तसेच रस्त्याच्या कडेला कुणी आहे का हे देखील चालकांना पहावे लागते. मात्र, बऱ्याचदा याकडे दुर्लक्ष होते. अंतर लवकर पार करण्याच्या नादात अपघात घडत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या गोष्टींकडे लक्ष देण्याची आणि वाहतुकीचे नियम पाळण्याची गरज आहे.

Sanjay Raut यांच्या बोलण्याला आम्ही काही महत्व देत नाही; गुलाबराव पाटलांचा टोला

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube