धनगर आरक्षणासाठी आंदोलन करणारे दीपक बोराडे यांच्या सासऱ्याची आत्महत्या, आंदोलन तीव्र होण्याची शक्यता

धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी दीपक बोऱ्हाडे यांचं मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू आहे.

News Photo   2026 03 25T212415.778

धनगर समाजारा आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन (Reservation) करणारे आंदोलक दीपक बोऱ्हाडे गेल्या दहा दिवसांपासून आझाद मैदान, मुंबई येथे उपोषणास बसले आहेत. सरकारने त्यांना अजून प्रतिसाद दिलेला नाही. हे सगळ होत असताना आज दीपक बोऱ्हाडे यांच्या सासऱ्यांनी आत्महत्या केली आहे. रामराव पाटील असं त्यांच्या सासऱ्यांचं नाव आहे. जालना शहरातल्या छत्रपती कॅलनीमध्ये राहत्या घरात त्यांनी गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं आहे.

धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी दीपक बोऱ्हाडे यांचं मुंबईतील आझाद मैदान येथे उपोषण सुरू आहे. त्यांची तब्येत खालावली आहे. उपोषणामुळे दीपक बोऱ्हाडे यांची तब्येत खालावत चालल्याचं बघवत नसल्यानं रामराव पाटील यांनी टोकाचं पाउल उचलल्याची माहिती समोर येत आहे. धनगर समाज आरक्षण आंदोलक दीपक बोऱ्हाडे यांच्या सासऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

सरकार धनगर, मराठा अन् ओबीसी समाजाला फसवतंय; शशिकांत शिंदेंचा आरोप

रामराव पाटील असं त्यांचं नाव आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी दीपक बोऱ्हाडे यांचं मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू आहे. उपोषणामुळे दिवसेंदिवस त्यांची तब्येत खालावत चालली आहे. बोऱ्हाडे यांची खालावत चालेली तब्येत बघवत नसल्यानं त्यांचे सासरे रामराव पाटील यांनी टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे. त्यांनी जालन्यात आपल्या रहात्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

सध्या धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण मिळावं अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सूरू आहे. धनगर समाजाच्या याच मागणीसाठी धनगर आरक्षण आंदोलक दीपक बोऱ्हाडे हे उपोषणाला बसले आहेत. मुंबईतील आझाद मैदान येथे त्यांचं उपोषण सुरू आहे. दीपक बोऱ्हाडे यांचं उपोष सुरू असतानाच ही धक्कादायक बातमी समोर आली आहे. दीपक बोऱ्हाडे यांच्या सासऱ्यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे.

follow us