मोठी बातमीः धनगड जातीचे सहा प्रमाणपत्र रद्द; धनगर जातीला एसटीमधून आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा?
Gopichand padalkar On Dhangar Reservation : राज्यातील धनगर समाजाला अनूसूचित जमातीचे आरक्षण देण्याची मागणी अनेक वर्षांपासून आहे. त्यासाठी राज्याभरात आंदोलने केली जातात. अनेक राज्यात धनगर समाजाला (एसटी) अनुसूचित जमातीचे आरक्षण (Dhangar Reservation) आहे. काही राज्यांमध्ये धनगर समाजाला धनगड म्हटले जाते. धनगड आणि धनगर समाज एकच आहे. त्यामुळे धनगर समाजाला एसटीमधून आरक्षणाची मागणी होत आहे. त्यात आता संभाजीनगरमधील काही जणांना धनगड समाजाच्या जातीचे दाखले देण्यात आले होते. हे जातीचे दाखले जात पडताळणी समितीने रद्द केले आहेत. त्यामुळे धनगर समाजातील अनुसूचित जमातीमधून आरक्षण मिळविण्याचा मार्ग मोकळा झाल्याचा दावा भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand padalkar) यांनी केला आहे.
‘माविआ’ 183 जागा जिंकणार अन् महायुतीला तीन अंकी संख्याही गाठता येणार नाही, माजी मुख्यमंत्र्यांचे भाकीत
धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण मिळविण्यासाठी अनेक वर्षांपासून लढाई सुरू आहे. राज्यामध्ये धनगड अस्तित्वात नाहीत, असा हायकोर्टाने धनगर आरक्षणाबाबत एक निकाल दिला होता. राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र दिले होते की राज्यामध्ये एकही धनगड नाही. पण दुर्देवाने संभाजीनगरमधील फुलंब्री तालुक्यातील भाऊसाहेब नामदेव खिल्लारे व त्यांच्या कुटुंबातील सहा जणांनी धनगड जमातीचे प्रमाणपत्र काढले होते. त्यातील सागर कैलास खिल्लारे यांनी जात पडताळणी समितीकडे प्रमाणपत्र सादर केले होते. परंतु पोलीस दक्षता पथकाच्या चौकशीमध्ये जातीसंदर्भात विसंगत माहिती व पुरावे मिळाले होते. त्यामुळे खिल्लारे यांना कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा मागविण्यात आला होता. आता छत्रपती संभाजीनगर येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने सुभाष नामदेव खिल्लारे यांच्यासह सहा जणांचे धनगड जातीचे प्रमाणपत्र रद्द केले आहे.
रावेरच्या आखाड्यात ‘नव्या भिडूं’मध्ये कुस्ती; भाजपचा पैलवान ‘चौधरींना’ थांबवणार?
यावर धनगर आरक्षणासाठी लढणारे गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जात पडताळणी समितीने एकदा दिलेला दाखला रद्द करण्याचा अधिकार जात पडताळणी समितीला नव्हता, तो अधिकार जात पडताळणी समितीला देऊन जे बोगस धनगडांचे दाखले काढले होते ते सहा दाखले रद्द केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे मनःपूर्वक आभार मानतो. यामुळे धनगर एसटी आरक्षणाचा मार्ग मोकळा असल्याचा दाव गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.