Uddhav Thackeray ; पाकव्याप्त एक इंच जमीन घेऊन दाखवा, आम्ही तुम्हाला मानू
छत्रपती संभाजीनगर : सावरकरांच्या नावाने यात्रा काढताय तर काढा. पण सावरकरांचे जे अखंड हिंदुस्थानचे स्वप्न होते ते स्वप्न पूर्ण करण्याचे तुमच्या वर बसलेल्या नेत्यांमध्ये हिंमत आहे का? असा सवाल छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) सभेतून उद्धव ठाकरे यांनी भाजप केला आहे. अमित शहा म्हणाले होते की उद्धव ठाकरेंना जमीन दाखवा आणि मला जमीन बघायची होती. पण ही माझी जमीन आहे तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेरुन आलेले आहात. जमीन दाखवायची असेल तर पाकव्याप्त एक इंच जमीन घेऊन दाखवा तर आम्ही तुम्हाला मानू. हिंदुत्वाच्या गप्पा करु नका, असे अव्हान उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपला दिले आहे.
सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात मोठा पुतळा तुम्ही गुजरातमध्ये बांधला आहे. सरदार वल्लभभाई यांनी मराठवाडा मुक्त केला तशी हिमत तुम्ही पाकव्याप्त काश्मिरमध्ये का दाखवत नाहीत. पुतळा उभारुन तुम्ही वल्लभभाई चोरत असाल तर त्यांच्याकडून काही घ्या. निवडणुका आल्या की लुटूपुटूच काही करणार आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली आहे.
Udhav Thackeray : जगातला शक्तिमान नेता अन् हिंदू पंतप्रधान असूनही…
लोकशाही कशी असायाला पाहिजे यासाठी इस्राएलकडे पाहायला हवं. इस्राएलचे अनेकांनी दौरे केले पण महाराष्ट्रात वाळवंटच राहिले. भाजप सध्या न्यायव्यवस्थेवर हल्ला करत आहे. न्यायव्यवस्थेवर ताबा मिळवायचा प्रयत्न करत आहेत. न्यायवृध्दांमध्ये आपले माणसं घुसवायचा प्रयत्न करत आहेत. सर्वोच्च न्यायालयातील न्यायमुर्तींच्या नेमणूका करताना आमचे ऐकले पाहिजे, अशी त्यांची वाटचाल सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्या गोष्टींना विरोध केला आहे. ज्या दिवशी न्यायालय यांच्या ताब्यात जाईल त्यादिवशी आपल्याला लोकशाहीला श्रध्दांजली द्यावी लागेल, असे टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
इस्राएलच्या पंतप्रधानांनी असा प्रकार करण्याचा प्रयत्न केला पण त्यांची जनता रस्त्यांवर उतरली. त्यामुळे त्यांना तो कायदा मागे घ्यावा लागला. मत देऊन तुम्ही पंतप्रधान निवडत असाल तर तुम्हाला पंतप्रधानावर वचक ठेवावा लागेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.