छ. संभाजीनगर हादरलं! शरीरसुखाला महिलेने नकार देताच सपासप वार, 280 टाके; नराधम गजाआड

Maharashtra News : भावकीतील महिलेला शरीरसुखाची मागणी केली पण तिने नकार देताच नराधमाने तिच्यावर कटरने सपासप वार केले. एक वार तर मानेपासून थेट कमरेपर्यंत होता. जखमी अवस्थेत विव्हळत ही महिला आता रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. तर दुसरीकडे काही झालंच नाही अशा अविर्भावात हा नराधम तरुण गावात वावरत होता. अखेर पोलिसांनी या हल्लेखोराला बेड्या ठोकून गजाआड केले आहे. घटना ऐकून कुणाच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल. हा धक्कादायक प्रकार औरंगाबादमध्ये रविवारी सायंकाळी घडली आहे. अभिषेक तात्याराव नवसुपे असे या पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. चिकलठाणा पोलिसांनी या आरोपीला अटक केली.
याबाबत अधिक माहिती अशी, संबंधित महिला शेतात काम करत होती. त्याचवेळी अभिषेकचा फोन आला. त्याने शरीरसुखाची मागणी केली. यानंतर महिलेने फोन कट केला. त्यानंतर संध्याकाळी शेतातील काम संपवून महिला घरी जात असताना अचानक पाठीमागून येऊन त्याने डोके दगडावर आपटले. यानंतर महिलेला काही कळायच्या आत त्याने कटरच्या मदतीने आधी चेहऱ्यावर वार केला. महिलेने ओरडण्याचा प्रयत्न करताच या नराधमाने तिच्या गळ्यावरच वार केला. लगेच शरीराच्या अन्य भागावर एकामागोमाग एक वार केले. एक वार तर इतका भयंकर होता की मानेपासून थेट कमरेपर्यंत जखम झाली.
Video : पुणे हादरलं! गजबजलेल्या स्वारगेट आगारात 26 वर्षीय तरूणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार
आता भयंकर वेदना सहन करत ही महिला खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. या महिलेला दोन मुले आहेत. माहेर आणि सासरची परिस्थिती बेताचीच आहे. त्यामुळे दवाखान्याचा खर्च कसा करायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. पीडितेच्या अंगावर तब्बल 280 टाके पडले आहेत. यासाठी लागणाऱ्या दोऱ्याचाच खर्च 22 हजार रुपये झाला आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना पीडित महिलेने ही माहिती दिली.