दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंचं तुफान भाषण, लक्ष्मण हाकेंना बघाताच म्हणाल्या, ‘हे गोंडस लेकरू…’
Pankaja Munde : लक्ष्मण हाके (Laxman Hake) म्हणजे गोंडस लेकारसारखे दिसतात. त्यांनी स्वत:हून इकडे येण्याचा निर्णय घेतला. मी माझ्या दसरा मेळाव्याला कुणालाही निमंत्रण देत नाही. पण लक्ष्मण हाके याठिकाणी आल्यानंतर त्यांनी भगवान बाबा आणि मुंडे साहेबांच्या स्मृतीस अभिवादन केले. मी या ठिकाणी त्याचं स्वागत करते, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
नवा मेळावा सुरू करून भगवानगड मेळाव्याची पवित्रता कुणी संपवू शकत नाही; धनंजय मुंडेंचा जरांगेंना टोला
आज बीड येथील सावरगाव घाटावर असलेल्या भगवान भक्तीगडावर पंकजा मुंडेचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्याला माजी खासदार प्रीतम मुंडे, मंत्री धनंजय मुंडे यांचीही उपस्थिती होती. विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांनी अनेक वर्षांनी पंकजा यांच्या दसरा मेळाव्याला हजेरी लावली होती.
दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी आपल्या खास शैलीत भाषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेही मंचावर उपस्थित होते. यावेळी त्यांची ओळख करून देताना पंकजा मुंडे यांनी हाकेंचा उल्लेख गोंडस लेकरू असा केला. तेव्हा जनसमुदायाने एकच जल्लोष केला.
यानंतर पंकजा मुंडे यांनी महादेव जानकर, मोनिका राजळे, मेघना बोर्डीकर, नमिता मुंदडा, माजी आमदार भीमराव धोंडे, सुरेश धस, नाना करपे, नवनाथ वाघमारे, सदाशिव खाडे, माजी आमदार खंदारे अशा मान्यवरांची लांबलचक यादी वाचली.
मला जनता प्रिय…
यावेळी त्यांनी प्रथमच एका युवकाची ओळख करून दिली. त्या तरुणाला स्टेजवर बोलावले आणि त्याला जवळ घेत पंकजा म्हणाल्या, हा गोरा मुलगा कोण आहे? हा माझ्यापेक्षा आर उंच.. फार गोड आहे. हा माझा मुलगा आर्यमन. तो भगवान बाबाच्या दर्शनाला आला. तुम्हाला वाटत असेल मला आर्यमन जास्त प्रिय आहे. पण, मी त्याला सांगितले की, तुझ्यापेक्षा मला माझी जनता प्रिय आहे. जेव्हा माझ्याव जीएसटीचा छापा पडला. तेव्हा या लोकांनी 12 कोटी रुपये भरले. या लोकांनी मला जीव लावला. तुम्ही सर्वांनी माझ्यावर मुलीसारखे प्रेम केले. आता मला काही नको, असं भावनिक भाषण पंकजा यांनी केलं.
या मेळाव्याला 18 पगड जातीचे लोक आले की नाही.. नाशिकहून आले का, नगरहून आले का, बुलढाण्यातून आले का, आता कुठून कुठून आले. तुम्हाला मी दरवर्षी सांष्टांग दंडवत घालते. कारण, माझ्या बापाने मरतांना माझ्या झोळीत तुमची जबाबदारी टाकली.. तुम्ही मला जिंकवलं, मला इज्जत दिली.. माझ्या पराभव झाल्यावर सर्वात अधिक इज्जत दिली, असं त्या म्हणाल्या.
यावेळी पंकजा यांनी परळीतून धनंजय मुंडेच विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट करत आता मी महाराष्ट्रातील कानोकोपऱ्यात दौऱ्याला येणार आहे. आपल्याला आपला डाव खेळायचा आहे, असं पंकजा म्हणाल्या.