मराठी पाट्यांसाठी मनसे आक्रमक, आठ दिवसांचा वेळ नाहीतर रस्त्यावर…

मराठी पाट्यांसाठी मनसे आक्रमक, आठ दिवसांचा वेळ नाहीतर रस्त्यावर…

MNS Aggressive Again Marathi Boards : दुकान व आस्थापणांना मराठी भाषेतील पाटी लावण्यात यावी यासाठी उच्च न्यायालयाने (High Court) मुदत दिली होती. मात्र ही मुदत संपल्यानंतर अनेक ठिकाणी अद्यापही परिस्थिती जैसे थी आहे, यामुळे आता मनसेने आक्रमक (MNS Aggressive) पाऊल उचलले आहे. न्यायालयाचा आदेश पाळून आपण तात्काळ आठ दिवसांच्या आत आपल्या आस्थापनेचे नाव मराठी भाषेत करून घ्यावे. अन्यथा मनसेच्या वतीने रस्त्यावर उतरून आंदोलन हातात घेतले जाईल. असे पत्र अहमदनगर (Ahmednagar News) शहरातील बाजारपेठेतील इंग्रजी भाषेत पाट्या असलेल्या व्यावसायिकांना दिले आहे.

आठ दिवसांचा अल्टिमेटम, अन्यथा रस्त्यावर….

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाराष्ट्रातील दुकानांवर मराठीत पाट्या हव्यात असे सांगून महाराष्ट्रात मराठी पाट्यांसाठी रान उठविले होते. त्यानंतर महाराष्ट्रातही अनेकांनी आपल्या आस्थापनांच्या पाट्या मराठीत केल्या होत्या. त्यानंतर मराठी पाट्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. त्यावर सुनावणी होऊन महाराष्ट्रात व्यवसाय करत असलेल्या प्रत्येक आस्थापनांची नामफलक हे मराठी देवनागरी लिपी मध्ये असावं हा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला.

परंतु आदेशानंतरही बऱ्याच दुकानदारांकडून दुर्लक्ष होत असल्याने मनसेकडून मराठी पाट्यांसाठी व्यावसायिकांना पत्राची मोहीम हाती घेतली आहे.

शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट; म्हणाल्या संघर्षाच्या या काळात..

मराठी नामफलकावर सर्वोच्च न्यायालयाने आदेश काढला आहे. आता हा विषय राजकीय राहीलेला नाही आता न्यायालयाचा आदेश पाळून आपण तात्काळ ८ दिवसांच्या आत आपल्या आस्थापनेचे नाव मराठी भाषेत करून घ्यावे. अन्यथा मनसेच्या वतीने आंदोलन हातात घेतले जाईल. असे पत्र महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने अहमदनगर शहरातील बाजारपेठेतील इंग्रजी भाषेत पाट्या असलेल्या व्यावसायिकांना दिले आहे. व्यावसायिकांनी ८ दिवसांत इतर भाषेतील पाट्या बदलून मराठी भाषेत लावाव्यात अन्यथा आठ दिवसांनंतर मनसे स्टाईल उत्तर दिले जाईल. असा इशारा मनविसेने दिला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube