दिल्लीपुढे गुडघे टेकवण्याशिवाय दुसरं काय येणार, खासदार अरविंद सावंतांनी मुख्यमंत्र्यांना डिवचलं

दिल्लीपुढे गुडघे टेकवण्याशिवाय दुसरं काय येणार, खासदार अरविंद सावंतांनी मुख्यमंत्र्यांना डिवचलं

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिल्लीपुढे गुडघे टेकवण्याशिवाय दुसरं काय येणार नसल्याची खरमरीत टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केलीय. ते मुंबईतून पत्रकार परिषदेत बोलत होते.

ते म्हणाले, आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील दिल्लीपुढे गुडघे टेकवत आहेत, त्यांना गुडघे टेकवण्याशिवाय दुसरं काही येणार नाही.
महाराष्ट्रात बेरोजगारी, सीमाप्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, उद्योगधंदे बाहेर चाललेत, या सर्व प्रश्नांवर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकही शब्द बोलत नाहीत. तर दुसरीकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री सीमावादावर मुजोराची भाषा वापरत आहेत. अन् आपले मंत्री मूलभूत प्रश्न सोडवण्याचे सोडून व्यक्तीगत निंदा करीत बसले असल्याचंही ते म्हणाले आहेत.

तसेच राज्यातील विविध प्रश्न सोडवण्याचे काम मी करतो आहे, राहुल शेवाळेंनी केलेले आरोप माझ्यासाठी महत्वाचे नसल्याचं त्यांनी स्पष्ट करुन एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिलेत तर त्यांनी त्यांच्या कामाला लागा, असंही ते म्हणाले आहेत.

संजय राऊत यांच्या ट्विटबद्दल मला काही कल्पना नाही. त्यांचा काय टाईम बॉम्ब आहे तो त्यांना माहित आहे मला माहित नाही. तुम्ही त्यांना याबाबत विचारा. त्यांचा बॉम्ब फुटल्यानंतर आपल्याला समजेलच. त्याबद्दल आत्ता काय बोलयचं, असं ते म्हणालेत.

दरम्यान, सीमावादाप्रश्नी कर्नाटकच्या सरकारची मुजोरी थांबत नसून त्यांनी सीमा प्रश्नी खालच्या पातळीवर गाठली आहे. कर्नाटक निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी या प्रश्नाला सुरुवात केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube