MPSC : गट ‘क’ अन ‘ड’चा राज्यस्तरावर एकच कट ऑफ लावा

MPSC : गट ‘क’ अन ‘ड’चा राज्यस्तरावर एकच कट ऑफ लावा

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नुकतीच ८१६९ अशी इतिहासातील सर्वात मोठी अशी विविध पदांची  जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यापैकी लिपिक-टंकलेखन संवर्गातील तब्ब्ल ७०४३ पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. परंतु, लिपिक पदासाठी पूर्व परीक्षेचा संपूर्ण महाराष्ट्रात एकच कट ऑफ लावावा अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीनेचे कार्याध्यक्ष महेश घरबुडे यांनी केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी आज खासदार श्रीकांत शिंदे यांना दिले.

कारण आयोगाने एकच कट ऑफ न लावता विभाग नियुक्ती प्राधिकारी निहाय कट ऑफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे तेच ते टॉपर विद्यार्थी अनेक विभागात  गणले जातील. तसेच ७०३४ लिपिक पदांच्या मुख्य परीक्षेसाठी उदाहरण बाराच्या गुणोत्तराने अंदाजे आठ हजार चारशे आठ विद्यार्थी पात्र होतील. परंतु, आताच्या निर्णयामुळे कदाचित १५ ते २० हजार उमेदवार यांनाच मुख्य परीक्षा देता येईल.

राज्यातील लाखो उमेदवारी या परीक्षेसाठी तयारी करत असून आजवरची आयोगाची प्रसिद्ध झालेली सर्वात मोठी जाहिरात आहे. त्यामुळे विभाग प्राधिकरण निकाल न लावता पूर्व परीक्षेनंतर राज्यस्तरीय एकच कट ऑफ लावण्यात यावा. राज्यसेवा जाहिरातीप्रमाणे एकच कट ऑफ लावत अंतिम निवड यादी बनवताना फक्त उमेदवारांची विकल्पता दिलेल्या विभागांच्या अधिकारांचा विचार करत त्यांनी दिलेला प्रेफरन्स नुसार नियुक्त देण्यात यावे यासाठी सामान्य प्रशासन विभाग तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगासोबत चर्चा करून मार्ग काढावा, अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube