कोर्टाचा लाडका निर्णय! ‘लाडकी बहीण’ योजनेविरोधातील याचिका HC ने फेटाळली

  • Written By: Published:
कोर्टाचा लाडका निर्णय! ‘लाडकी बहीण’ योजनेविरोधातील याचिका HC ने फेटाळली

मुंबई : लाडकी बहीण योजनेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) दाखल याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) मोठा दिलासा मिळाला आहे. या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक भार पडेल, असा दावा करत याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, आता ही याचिका आता उच्च न्यायालयाने फेटाळून लावत हा सरकारचा धोरणात्मक निर्णय असल्याने न्यायालयाने म्हटले आहे. Bombay High Court Dismisses PIL Againts State’s Ladki Bahin Yoajana

कोर्टात काय झालं?

शिंदेंच्या लाडकी बहीण योजनेमुळे (Ladki Bahin Yojana) राज्याच्या तिजोरीवर आर्थिक भार पडेल, असा दावा करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर आज (दि. 5) मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या खडपीठासमोर सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. हा सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे, त्याला स्थगिती देता येणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे 14 ऑगस्टला सरकारी तिजोरीतून जाणा-या पहिल्या हफ्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

फी आणि कर यात फरक

कर भरतो म्हणून सुविधा द्या, अशी मागणी करता येत नाही. ‘फी’ आणि ‘कर’ यात फरक आहे. लाडकी बहीण योजना ही सरकारनं बजेटच्या अंतर्गत घेतलेला निर्णय, त्याला आव्हान कसं देता येईल? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना  केला.

शिवसैनिकांच्‍या दृष्‍टीने खरा शिवसेना पक्ष कुणाकडं?, डॉ. प्रकाश आंबेडकरांनी एकदम थेटच सांगितलं

योजना नेमकी काय?

नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात महिला वर्गाला खुश करण्यासाठी महायुती सरकारनं अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. 21 ते 65 वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. 1 जुलैपासून या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट ही शेवटची तारीख असणार आहे. तर, 14 ऑगस्टला सरकारी तिजोरीतून लाडक्या बहीणींना पहिला हप्ता दिला जाणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube