मूळ प्रश्नांवरुन जनतेचं लक्ष हटवण्यासाठी सावकरांचा मुद्दा… नाना पटोलेंचा आरोप

मूळ प्रश्नांवरुन जनतेचं लक्ष हटवण्यासाठी सावकरांचा मुद्दा… नाना पटोलेंचा आरोप

मुंबई : राज्यातील जनतेच्या मूळ प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी भाजपाकडून सावरकरांचा मुद्दा पुढे करण्यात आला असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. विविध विषयांवर नाना पटोलेंना भाजपवर निशाणा साधला आहे.

Rupali Thombre : शिरसाट हा विकृत माणूस, आम्हाला त्याचे…; ठोंबरेंचा हल्लाबोल

नाना पटोले म्हणाले, भारतीय जनता पक्षाकडे देशातील जनतेला भेडसावत असलेल्या ज्वलंत समस्यांवर कोणतेही उत्तर नाही. मोदी सरकार सर्वच आघाड्यांवर सपशेल अपयशी झालेले आहे. जनता महागाई, बेरोजगारीने त्रस्त आहे, त्यावर भाजपा उत्तर देऊ शकत नसल्याचं ते म्हणाले आहेत.

तसेच ९ वर्षांपासून केंद्रात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार आहे. परंतू या सरकारने जनतेच्या हिताचे एकही काम केलेले नाही. अर्थव्यवस्थेचा बोजवारा उडलेला आहे, महागाईने जनतेचे कंबरडे मोडले आहे, जगणे कठीण झाले आहे, बेरोजगारीने तरुणवर्ग त्रस्त आहे, नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या युवकांचे भविष्य अंधःकारमय झाल्याची टीकाही त्यांनी यावेळी केलीय.

ठाकरेंना सावरकरांचा खरंच आदर असेल तर.., रणजित सावरकरांनी व्यक्त केली नाराजी

मागील नऊ वर्षांत मोदी सरकार शेतकऱ्यांचा विकास करु शकलेलं नाही. मूळ प्रश्नांवर भाजपाकडे सांगण्यासारखे काहीच नाही म्हणून जाणीवपूर्वक सावरकरांचा मुद्दा पुढे करुन मुळ मुद्द्यांपासून जनतेचे लक्ष हटवण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.

राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजपने सर्व प्रयत्न करुन पाहिले, पण त्यात त्यांना यश आले नाही. आताही खासदारकी रद्द केली, सरकारी घर खाली करण्यास सांगितले, त्याआधी ईडी चौकशी मागे लावली पण राहुल गांधी मागे हटले नसल्याचं ते म्हणाले आहेत.

दरम्यान, देशात आज लोकशाही व्यवस्था, संविधान धोक्यात आलेले आहे, सर्व यंत्रणा सरकारच्या कठपुतली बाहुल्या झाल्या आहेत, याविरोधात लढा देण्याची गरज असून राहुल गांधी व काँग्रेस पक्ष लोकशाही व संविधान वाचवण्यासठी लढत आहेत आणि ही लढाई आम्ही लढत राहु, असेही नाना पटोले म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube