नांदेड ते पुणे अन् नांदेड ते नागपूर विमानसेवा अखेर सुरू; पाच वर्षांनी ‘स्टार एअर कंपनी’चा पुढाकार
Nanded to Pune flight Service Start : नांदेड पुणे आणि नांदेड नागपूर विमानसेवा सुरू झाली आहे. (flight Service) गेली अनेक पर्षांपासून ही विमानसेवा प्रतीक्षेत होती. ही सेवा सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी ५५ प्रवाशांनी नांदेड ते पुणे असा प्रवास केला आहे. मागील पाच वर्षांपासून बंद असलेली ही (Nanded to Nagpur ) विमानसेवा “स्टार एअर कंपनी”ने सुरू केली आहे.
भीषण अपघात! टेम्पो ट्रॅव्हलर ट्रकची जोरदार धडक, अपघातात 13 प्रवाशांचा मृत्यू
जिल्हाधिकार्यांकडे मागणी केली होती
नांदेड येथे एप्रिल महिन्यापासून नवी दिल्ली-अहमदाबाद-बेंगलोर, तिरुपती अशी विमानसेवा सुरु झाली होती. नांदेड-हैद्राबाद विमानसेवा देखील सुरु करण्यात आली होती. नांदेडकरांची मागणी होती की, नांदेडहून पुण्यासाठी जाणार्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. नांदेडची अनेक मुलं पुण्यात शिकण्यासाठी, नौकरीसाठी आहेत. अनेकजण त्याठिकाणी स्थायिकही झाले आहेत. पुण्याला जाण्यासाठी नांदेडहून मोठ्या प्रमाणात ट्रॅव्हल्स आहेत. रेल्वेचं वेळापत्रक देखील सोयीचं नाही. त्यामुळें अन्य विमानसेवेसोबत नांदेड-पुणे, नांदेड-मुंबई व नांदेड-नागपूर हि विमानसेवा सुरु करण्यात यावी, अशी मागणी अनेकांनी जिल्हाधिकार्यांकडे केली होती.
नांदेड ते नागपूर विमानसेवा उपाध्यक्षपदासाठीही NDA चा मोठा गेम पक्षाला संधी देत विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम?
या मागणीनंतर अखेर 15 दिवसापूर्वी घोषित केल्याप्रमाणे स्टार एअरची नांदेड-पुणे सेवा आजपासून सुरु झाली आहे. 80 आसन क्षमतेचं हे विमान असून स्टार एअर कंपनीने हि विमानसेवा सुरु केली आहे. नांदेड ते पुणे 2800 रुपये असं भाडं असून, केवळ 40 मिनिटात हे विमान पुण्याला पोहंचेल. आज पहिल्याच दिवशी अनेक प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला. विमान प्राधिकरण अधिकार्यांनी आज 55 प्रवाशी या विमानाने गेल्याचं सांगितले. नांदेड ते नागपूर ही विमानसेवा देखील आजपासून सुरु झाली असून, विदर्भाला मराठवाड्याचे कनेक्शन आता मिळाले आहे. यामुळे प्रवाशांनी आनंद व्यक्त केला आहे.