राष्ट्रवादीचं ठरलं! रौप्य महोत्सवी वर्धापन दिन मुंबईत…

राष्ट्रवादीचं ठरलं! रौप्य महोत्सवी वर्धापन दिन मुंबईत…

अहमदनगरला होणारा राष्ट्रवादी काँग्रेसचा रौप्य महोस्वी वर्धापन दिन उद्या 21 जून रोजी मुंबईत होणार आहे. मुंबईतील माटुंगा परिसरातील शन्मुखानंद हॉल इथं दुपारी 2 वाजता वर्धापन दिनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. यासंदर्भातील माहिती राष्ट्रावादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून 9 जून रोजीच हा कार्यक्रम अहमदनगरच्या केडगावमध्ये आयोजित करण्यात आला होता. मात्र, हवामान बदलल्याने वर्धापन दिनाचा मेळावा रद्द करण्यात आला होता. त्यानंतर आता वर्धापन दिन उद्या मुंबईत होणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी पत्राद्वारे दिलीय.

परभणी : भाजपचे ‘कमळ’ कोमेजणार? राष्ट्रवादीचा ‘गजर’ अन् काँग्रेस, ठाकरेंनाही मिळणार दिलासा

जयंत पाटील यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रात म्हटलं, फुले-शाहु-आंबेडकरी विचारांचं रोपटं 10 जून 1999 रोजी रोवण्यात आलं. पक्षाचेे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाची मुहूर्तमेढ रोवली. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 24 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. उद्या आयोजित केलेल्या वर्धापन दिन सोहळ्याला राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन जयंत पाटील यांनी केलं आहे.

News Arena India Survey : रोहित पवारांना धोबीपछाड देणे राम शिंदेंना अवघडच

काही दिवसांपूर्वीच मुंबईतील खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या सोहळ्यात उष्माघातामुळे 14 जणांना जीव गमवावा लागला. त्यामुळेच उन्हाचा त्रास नको म्हणून हा मेळावा सायंकाळी ठेवण्यात आला होता. मात्र आता, हवामान बदलले असून हवामान विभागाने चक्रीवादळाचा इशारा दिला आहे. त्यामुळे सावध होत राष्ट्रवादी काँग्रेसने हा मेळावा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

Uddhva Thackeray : जनतेच्या पैशांचा हिशोब थेट BMC मध्ये जाऊनच विचारणार; 1 जुलैला विराट मोर्चा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदनगरमध्ये अधिक लक्ष घातल्यानेच राष्ट्रवादीने वर्धापन दिनाचा कार्यक्रम अहमदनगरमध्ये घेण्याचं नियोजन आखलं होतं. अहमदनगरमध्ये होणाऱ्या वर्धापन दिनासाठी कार्यकर्त्यांना ताकद दाखवण्याचे आदेशही देण्यात आले होते. त्यानूसार कार्यकर्त्यांकडून जोमाने तयारीही सुरु करण्यात आली होती. ज्या ठिकाणी वर्धापन दिन होणार होता, त्या ठिकाणाची जयंत पाटलांनी पाहणीही केली होती.

भाजपात असतानाही…; शिंदेच्या ताफ्यात जाताच कायंदेंनी धनुष्यातून सोडले गौप्यस्फोटांचे बाण

आज हवामान विभागाचा अंदाजानंतर वर्धापन दिनाचा मेळावा रद्द करण्यात आला होता. पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असून त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची दाट शक्यता होती. या बिपरजॉय चक्रीवादळामुळे वेधशाळेने राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी, सामान्य नागरिक व प्रशासनाची गैरसोय होऊ नये म्हणून तसेच वेधशाळेच्या सतर्कतेच्या इशाऱ्याचे पालन करून आपण वर्धापनदिनाचा हा कार्यक्रम पुढे ढकलत असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली होती.

दरम्यान, आज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उद्या होणाऱ्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाबाबत माहिती दिली असून उद्या दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाला पदाधिकाऱी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असं आवाहनही जयंत पाटील यांनी केलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube