Karnataka Elections Result 2023 : कर्नाटकात राष्ट्रवादी उघडणार खात?; निपाणीतून उत्तम पाटील जिंकणार?

Karnataka Elections Result 2023 : कर्नाटकात राष्ट्रवादी उघडणार खात?; निपाणीतून उत्तम पाटील जिंकणार?

NCP Open Account in Karnataka : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी ( Karnataka Elections) 10 मे ला मतदान घेण्यात आलं. त्यानंतर निकाल आज (13 मे) जाहीर होणार आहेत. दरम्यान यावेळी कर्नाटकची जनता कुणाला कौल देणार? हे आज समोर येणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून ही मतमोजणी सुरू झाली आहे. तर दुपारी दोन वाजेपर्यंत हे कौल हाती येतील असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.

karnatak asembly election 2023 : कर्नाटकमध्ये राजकीय घडामोडींना वेग, कॉंग्रेसने सर्व आमदारांना बेंगळुरूला बोलावलं

कर्नाटकच्या सर्व 224 जागांचे कल हाती आले आहेत. त्यानुसार असं दिसून येत आहे. की राष्ट्रवादी कॉंग्रेस कर्नाटकमध्ये खात उघडणार आहे. कारण या सीमाभागाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे. निपाणी मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उत्तम पाटील रिंगणार आहेत.पण येथे भाजप उमेदवार अण्णासाहेब जोल्हे हे पुढे आहे. त्यामुळं राष्ट्रवादी कर्नाटकात खातं उघडणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Karnataka Elections Result 2023 : भाजपची घसरण सुरूच; काँग्रेसची सत्तेच्या दिशेने वाटचाल

त्यामुळे एकंदरीतच बेळगावमध्ये काँग्रेसचा वरचष्मा दिसून येत आहे. उत्तम पाटील यांच्यासाठी शरद पवार यांनी सभा घेतली होती. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी देखील इथे सभा घेतली होती. तर या भागात महाराष्ट्र एकीकरण समितीची पूर्णपणे निराशा झाली आहे. सुरूवातीच्या कलांमध्ये एकही उमेदवार आघाडीवर नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube