Karnataka Elections Result 2023 : भाजपची घसरण सुरूच; काँग्रेसची सत्तेच्या दिशेने वाटचाल

Karnataka Elections Result 2023 : भाजपची घसरण सुरूच; काँग्रेसची सत्तेच्या दिशेने वाटचाल

Karnataka Elections Result : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी ( Karnataka Elections) 10 मे ला मतदान घेण्यात आलं. त्यानंतर निकाल आज (13 मे) जाहीर होणार आहेत. दरम्यान यावेळी कर्नाटकची जनता कुणाला कौल देणार? हे आज समोर येणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून ही मतमोजणी सुरू झाली आहे. तर दुपारी दोन वाजेपर्यंत हे कौल हाती येतील असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.

कर्नाटकच्या सर्व 224 जागांचे कल हाती आले आहेत. त्यानुसार भाजप ६८ जागांवर घसरली आहे. तर काँग्रेस १३७ जागांच्या आघाडीवर पोहोचली आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस पुन्हा सत्तेवर येताना दिसत आहे. भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे. कर्नाटकमध्ये दर पाच वर्षांनी सत्ता बदलाचा इतिहास आहे. त्यानुसार जागांचे कल हाती येत आहे.

Karnataka Elections Result 2023 : भाजपची ६८ जागांवर घसरण; काँग्रेसची सत्तेच्या दिशेने वाटचाल

तसेच वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीचा इतिहास पाहिला तर सत्ताधारी पक्षांना धक्का बसला आहे. आताही तसेच होणार का, भाजप सत्तेतून बेदखल होईल का, जेडीएस किंगमेकर ठरेल का, काँग्रेसचा वनवास संपेल का, सीमाभागात राष्ट्रवादी काँग्रेस चमत्कार करणार का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.

Karnataka Elections : कर्नाटकची जनता कुणाला कौल देणार? निवडणुकीचा निकाल जाहीर होणार

राज्यातील 224 जागांसाठी एकूण 2 हजार 615 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. यंदा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पार्टी असे पक्षही नशीब आजमावत आहे. या पक्षाच्या उमेदवारांना किती यश मिळेल हे उद्याच कळेल. मात्र, येथे खरी लढत भाजप आणि काँग्रेस यांच्यातच आहे. यावेळी काँग्रेसने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती. निवडणुकीच्या नियोजनातही फारसा गोंधळ दिसला नाही. तिकीट वाटपात आणि त्यानंतर नाराजी बंडखोरी उफाळून येणार नाही याची काळजी घेण्यात आली. भाजपातील नाराजांना तिकीटे देण्यात आली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube