Karnataka Elections : कर्नाटकची जनता कुणाला कौल देणार? निवडणुकीचा निकाल जाहीर होणार
Karnataka Elections Result : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी ( Karnataka Elections) 10 मे ला मतदान घेण्यात आलं. त्यानंतर निकाल आज (13 मे) जाहीर होणार आहेत. दरम्यान यावेळी कर्नाटकची जनता कुणाला कौल देणार? हे आज समोर येणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून ही मतमोजणी सुरू झाली आहे. तर दुपारी दोन वाजेपर्यंत हे कौल हाती येतील असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.
तसेच वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीचा इतिहास पाहिला तर सत्ताधारी पक्षांना धक्का बसला आहे. आताही तसेच होणार का, भाजप सत्तेतून बेदखल होईल का, जेडीएस किंगमेकर ठरेल का, काँग्रेसचा वनवास संपेल का, सीमाभागात राष्ट्रवादी काँग्रेस चमत्कार करणार का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.
Karnataka Elections : वाढला मतदानाचा टक्का, कुणाला धक्का? भाजप-काँग्रेसमध्ये घमासान
राज्यातील 224 जागांसाठी एकूण 2 हजार 615 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. यंदा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पार्टी असे पक्षही नशीब आजमावत आहे. या पक्षाच्या उमेदवारांना किती यश मिळेल हे उद्याच कळेल. मात्र, येथे खरी लढत भाजप आणि काँग्रेस यांच्यातच आहे. यावेळी काँग्रेसने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती. निवडणुकीच्या नियोजनातही फारसा गोंधळ दिसला नाही. तिकीट वाटपात आणि त्यानंतर नाराजी बंडखोरी उफाळून येणार नाही याची काळजी घेण्यात आली. भाजपातील नाराजांना तिकीटे देण्यात आली.
Karnataka Exit Poll : कर्नाटकात काँग्रेसच सर्वात मोठा पक्ष पण…
भाजपनं हेरलं, केला तुफान प्रचार
तर दुसरीकडे भाजपने मात्र अनेक विद्यमान आमदारांना घरचा रस्ता दाखवला. त्यामुळे नाराजी वाढली. बंडखोरीही झाली. तसेच निवडणुकीआधी घेतलेल्या काही निर्णयांमुळेही पक्षाची वाटचाल कठीण झाल्याचे बोलले जात आहे. या गोष्टीचा अंदाज आल्याने भाजपाने जोरदार प्रचार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी नेत्यांनी तुफान प्रचार केला. भव्य रोड शो, रॅलीला लोकांचीही गर्दी झाली होती. आता या गर्दीचे मतात किती रुपांतर झाले, हे उद्या मतमोजणीनंतरच कळणार आहे.