अजितदादांच्या सत्कारासाठी मागे पळणाऱ्या शिक्षणमंत्र्याला पवारांच्या कानपिचक्या

अजितदादांच्या सत्कारासाठी मागे पळणाऱ्या शिक्षणमंत्र्याला पवारांच्या कानपिचक्या

Sharad Pawar On Deepak Kesarkar :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवीस, अजित पवार, राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना एक पत्र लिहले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी प्रसिद्ध केलेल्या परफॉर्मेंस ग्रेडिंग इंडेक्स २.० (पी जी आय) अहवालानुसार महाराष्ट्र राज्याची दुसर्‍या स्थानावरून थेट सातव्या स्थानावर घसरण झाली आहे. यावरुन शरद पवार यांनी पत्र लिहीत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना कानपिचक्या दिल्याचे बोलले जात आहे. ( Sharad Pawar wrote a letter to Deepak Kesarkar )

शरद पवारांनी पत्रात काय म्हटले आहे? 

पुरोगामी महाराष्ट्राला शिक्षणाचा समृद्ध वारसा आहे. म. ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यासारख्या समाजसुधारकांनी सर्व सामान्य, बहुजन, कष्टकरी कुटुंबातील मुलाना शिक्षणाची कवाडे खुली केली. असे असताना नुकताच केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने २०२१ – २२ या शैक्षणिक वर्षासाठी प्रसिद्ध केलेल्या परफॉर्मेंस ग्रेडिंग इंडेक्स २.० ( पी जी आय) अहवालानुसार महाराष्ट्र राज्याची सातव्या स्थानावर घसरण झालेली दिसते. यापूर्वी आपले राज्य दुसऱ्या क्रमांकावर होते.

तरीही दादांनी दोन मतं देऊन आमदार केलं, धनंजय मुंडेंनी सांगितलं ‘ते’ सिक्रेट

ज्या निकषांच्या आधारे हे मूल्यमापन केले जाते त्यामध्ये अध्ययन निष्पत्ती व गुणवत्ता, शाळा व शिक्षकांची उपलब्धता, वर्गातील प्रभावी अध्ययन, उपक्रम, पायाभूत सुविधा, शाळा व विद्यार्थ्यांची सुरक्षितता, डिजिटल अध्ययन आणि प्रशासकीय प्रक्रिया, निधीचा वापर, हजेरी नियंत्रण यंत्रणा आणि शाळा नेतृत्व विकास आदी मुद्द्यांचा समावेश होता. या साऱ्यांचा विचार करता आपण राज्य म्हणून यामध्ये खूपच मागे पडलो आहोत, हे फार चिंताजनक आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या शिक्षण विभागाने, मागील वर्षी ‘दोन शिक्षकी शाळांचे सक्षमिकरण’ या विषयावर एक दिवसीय परिषद घेतली होती. ( याबाबत आपणास देण्यात आलेले निवेदन पुन्हा देत आहोत). जिल्हा परिषदेच्या जवळपास ३८००० दोन शिक्षकी शाळा महाराष्ट्रात आहेत. या दोन शिक्षकी शाळा प्रामुख्याने वाड्या-वस्त्यांवर आहेत. या शाळांची विद्यार्थी पट संख्या कमी असल्या कारणाने त्या बंद करण्याची चर्चा अधून मधून होत असते, त्याची गंभीर दाखल घेण्यात यावी. महाराष्ट्र राज्यात शिक्षणामध्ये नावीन्यपूर्ण उपक्रम झालेले आहेत. त्यामध्ये सरकारसोबत संस्था आणि लोकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग राहिलेला आहे.

शासन तुमच्या दारी हे घरी बसणाऱ्यांना कसं कळेल? CM शिंदेचा ठाकरेंना खोचक टोला

या सर्व बाबींचा विचार करता राज्य शासनाने याचा गांभीर्याने विचार करावा आणि सर्व संबंधितांची बैठक लवकरात लवकर बैठक बोलावून आवश्यक उपाय योजना राबावण्याबाबत कृती कार्यक्रम तयार करावा व शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीत अग्रस्थानी आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा आहे.

दरम्यान, 2 जुलै रोजी अजित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्यानंतर शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये केसरकर हे अजितदादांचे  अभिनंदन करण्यासाठी त्यांच्या गाडीच्या मागे धावताना दिसून आले होते. त्यानंतर आता राज्यातील घसरलेल्या शैक्षणिक दर्जामुळे अजितदादांच्या गाडीमाग धावणाऱ्या केसरकरांना शरद पवारांनी कानपिचक्या लगावल्याचे बोलले जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube