NEET Paper Leak Case-पेपर सेटर प्राध्यपकानेच पेपर फोडला ? लातूरमधील निवृत्त प्राध्यापक सीबीआयच्या जाळ्यात
NEET - लातूरमधील निवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी याला अटक करण्यात आली आहे. नीटचा पेपर पी. व्ही. कुलकर्णी (P V Kulkarni) यानेच सेट केला होता.
NEET Paper Leak Case Latur Retired Professor arrested : वैद्यकीय शिक्षणासाठी पात्र ठरणाऱ्या नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणात मोठा मासा सीबीआयच्या (CBI) हाती लागला आहे. लातूरमधील निवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी याला अटक करण्यात आली आहे. नीटचा पेपर पी. व्ही. कुलकर्णी (P V Kulkarni) यानेच सेट केला होता. त्यानेच तो पेपर फोडल्याचा संशय सीबीआयला आहे. त्यानुसार आता कुलकर्णीकडे सीबीआय चौकशी करत आहे.
कागदपत्रे, मोबाइल जप्त
नीट पेपर फुटीप्रकरणी नाशिक, अहिल्यानगर, पुणे, लातूर अशा चार शहरामध्ये चार आरोपी सीबीआयने अटक केले आहेत. त्यामुळे तपासाच्या दृष्टीने लिंक सापडली आहे. निट पेपर फुटीप्रकरणी नाशिक, अहिल्यानगर, पुणे, लातूर अशा चार शहरामध्ये चार आरोपी सीबीआयने अटक केले आहेत. त्यामुळे तपासाच्या दृष्टीने लिंक सापडली आहे. सीबीआयचे एक पथक लातूरमध्ये सेवानिवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी यांच्या घरी दाखल झाले आहे. सेवानिवृत्त प्राध्यापकाला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्या घरातील काही कागदपत्रे व मोबाइल जप्त करण्यात आले आहेत.
साखर निर्यातीवर बंदी; ‘कडू’ निर्णयामुळे साखर कंपन्यांचे शेअर्स किती टक्क्यांनी कोसळले ?
ब्यूटी पार्लर चालविणाऱ्या महिलाच्या संपर्कात
पेपर लीक प्रकरणी पुण्यात ब्युटी पार्लटर चालविणाऱ्या मनीषा वाघमारे हिला अटक करण्यात आलेली आहे. तिच्या कॉल डिटेल्सनुसार ती महिला सेवानिवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी याच्या संपर्कात होती. त्यानुसार निवृत्त प्राध्यापकाला सीबीआयने अटक केलीय.
पेपर सेट केला अन् फोडला ही ?
अटक करण्यात आलेला सेवानिवृत्त प्राध्यापक हा नीट (NEET)च्या पेपर सेट करणाऱ्यापैकी एक असल्याचे समोर येत आहे. या सेवानिवृत्त प्राध्यापकाला आता अटक करण्यात आली आहे. त्यामुळे हा पेपर कसा फुटला आणि किती पैशांसाठी फोडला हे समोर येऊ शकतो. या प्राध्यापकाला अटक केल्यानंतर लातूरमधील कोचिंग सेंटर आणि काही महाविद्यालयाचे प्राध्यापकांचा सहभाग आहे का याचा शोध सुरू झाला आहे.