संसद भवनाला विरोधकांचा आक्षेप; शिंदेंनी सांगितलं विरोधाचं नेमकं कारण
Eknath Shinde on New Parliament Building : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) आज स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीचे औचित्य साधत नव्या संसद भवनाचे उद्घाटन केले. या चांगल्या कार्यक्रमालाही काही लोकांनी आक्षेप घेत मिठाचा खडा टाकला. हे दुर्दैव आहे. घरणेशाहीत अडकलेल्या पक्षांना सावरकर, हिंदुत्व, संस्कृती आणि देशाचे कल्याण या गोष्टींचे वावडे आहे, हेच यातून दिसत आहे. पंतप्रधान मोदी जगभरात आज आघाडीचे नेते बनले आहेत. देशाची अर्थव्यवस्था अकराव्या क्रमांकावर होती ती आता पाचव्या क्रमांकावर आली आहे. त्यामुळे अनेक लोकांना पोटदुखी झाली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आज दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
‘संसद भवन लोकशाहीतलं मंदिर, त्याचा इव्हेंट करू नका; सुळेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल
शिंदे पुढे म्हणाले, काही लोकांना सावरकर पटत नाहीत आणि आज त्यांच्याच जयंतीच्या दिवशी हा कार्यक्रम होतोय म्हणून अशा प्रकारचा प्रयत्न होत आहे. पंतप्रधान मोदी जगभरात आज आघाडीचे नेते बनले आहेत. देशाची अर्थव्यवस्था अकराव्या क्रमांकावर होती ती पाचव्या क्रमांकावर आली आहे. त्यामुळे अनेक लोकांना पोटदुखी होत आहे. मी काल म्हटले होतेच ज्या लोकांना पोटदुखी झाली आहे त्यांना या देशातील जनता जमालगोटा देईलच, असे शिंदे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याने सभागृहात जोरदार हास्यकल्लोळ उडाला.
दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसदेच्या इमारतीचे उद्घाटन केले. मोदी यांच्या हस्ते सेंगोल सभागृहात स्थापित करण्यात आला. या कार्यक्रमाला विविध राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते. काँग्रेससह 21 विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर टाकला होता. या नव्या संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावे, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला, पुरोहितांनी वैदिक मंत्रोच्चारांमध्ये पंतप्रधान मोदींना सेंगोल म्हणजेच राजदंड दिला. राजदंड हातात घेण्याआधी पीएम मोदींनी सेंगोलसमोर साष्टांग दंडवत घेत नतमस्तक झाले. यानंतर त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासोबत नवीन संसद भवनात सेंगोलची स्थापना केली. सोहळ्याची सुरुवात पूजाविधीने झाली.ही पूजा सुमारे तासभर चालली. नवीन संसदेत सेंगोल बसवल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ही इमारत बांधणाऱ्या मजुरांची भेट घेतली. यावेळी त्यांनी या मजुरांचा सत्कारही केला.
देशाला मिळाली संसदेची नवी इमारत; पंतप्रधान मोदींकडून वीर सावरकरांना आदरांजली
आधी शिंदेच बोलतील
या कार्यक्रमात मान्यवरांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभवादन केल्यानंतर सूत्रसंचालकांने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषण करतील असे म्हटले. यावर काहीतरी चुकल्याचे लक्षात येताच फडणवीस यांनी स्वतः त्या सूत्रसंचालकाला सीएम बोलतील असे सांगितले. त्यानंतर या सूत्रसंचालकांनी लागलीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव घेतले. या प्रसंगाचीही नंतर येथे चर्चा सुरू होती.