अशा मच्छरांना मारण्सासाठी गुड नाईटची कॉइल लागते; राऊतांच्या रेकी प्रकरणावरून राणेंचा टोला
संजय राऊत यांच्या घराची दोन जणांनी रेकी केल्यामुळे त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी

Nitesh Rane on Sanjay Raut Home Reiki : शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या घराची रेकी केल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर राजकीय वातावरण तापलं होतं. दरम्यान, त्यावर सर्वच नेत्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. (Nitesh Rane) आता त्यावर भाजप आमदार आणि नुकतीच ज्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली ते नितेश राणे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊतांच्या घराची दोन अज्ञातांकडून रेकी, बाईकवरून आलेल्यांकडे 8 ते 10 मोबाईल, तपास सुरू
या प्रकरणावर बोलताना राणे म्हणाले, मच्छर मारायला गुड नाइटचे कॉइल लावावे लागतात. त्यासाठी रेकी करायची गरज नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे. ते विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.
संजय राऊत यांच्या घराची दोन जणांनी रेकी केल्यामुळे त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली होती. या पार्श्वभूमीवर बोलताना नितेश राणे म्हणाले, खिचडीचोर नेमका कुठे राहतो, खिचडी कुठे डिलीव्हर करायची आहे हे पाहण्यासाठी ते लोक आले असावेत असा टोला त्यांनी लगावलाय.
संजय राजाराम राऊत यांना महाराष्ट्राच्या राजकारणात फारसे महत्त्व नाही. त्यांचे राजकीय महत्त्व जनतेने संपवलं आहे. अशा मच्छरांना मारण्यासाठी आम्ही गुड नाइटचे कॉल लावून टाकू, ते आपोआप पळून जातील. सध्या मच्छराच्या मदतीला पेंग्विन आला आहे. याला फार गांभीर्याने घेऊ नये असंही ते म्हणालेत.