महसूल गेलं, जलंसपदाही अर्धचं मिळालं; मातब्बर विखेंचं मंत्रिमंडळात डिमोशन?

महसूल गेलं, जलंसपदाही अर्धचं मिळालं; मातब्बर विखेंचं मंत्रिमंडळात डिमोशन?

Radhakrishna Vikhe : राज्यात महायुतीचे सरकार अस्तित्वात आले त्यानंतर खातेवाटप जाहीर झाले व यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांना धक्का बसला. विशेष म्हणजे विधानसभेत महायुतीच्या बाजूने जनतेने दिलेला कौल व वरचढ ठरलेल्या भाजपमधील अनेक ज्येष्ठ नेत्यांना धक्का बसला. भाजपचे ज्येष्ठ नेते असलेले राधाकृष्ण विखे यांच्याकडील महसूल खात्याचा कारभार काढून घेत त्यांना जलसंपदा खाते देण्यात आले. तेही गोदावरी व कृष्णा खोरे विकास विभागाची जबाबदारी विखे यांना मिळाली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना महसूलमंत्री हे महत्त्वाचे खाते मिळाले आहे. फडणवीस सरकारमध्ये नगर जिल्ह्यावर मंत्रिपद वाटपाबाबत अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली जाऊ लागली आहे. तर मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर महायुतीकडून भाजपातील वरिष्ठ नेत्यांचे पंख छाटले जात असल्याची तसेच त्यांचे राजकीय अस्तित्व संपवण्याचा डाव रचला जात असल्याचे चित्र या माध्यमातून अधोरेखित होऊ लागले आहे.

नगर जिल्ह्याबाबत बोलायचे झाले तर कधीकाळी राष्ट्रवादीच्या शरद पवार यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगर जिल्ह्यात युतीने बाजी मारली. अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. नवख्या उमेदवारांनी बाजी मारली. जिल्ह्यात उमेदवारांच्या विजयाची जबाबदारी ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे यांच्या खांद्यावर होती. विखे यांना पक्षाकडून मिळालेली जबाबदारी त्यांनी योग्यरित्या पार पडत नगर जिल्ह्यात महायुतीचे उमेदवार निवडून आणले. यानंतर जिल्ह्याला एकाहून अधिक मंत्रि‍पदे मिळतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र पदरी निराशा पडली. जिल्ह्याला फक्त एकाच मंत्रिपदावर समाधान मानावे लागले.

“फडणवीसांनी जबाबदारी दिली मी पूर्ण समाधानी”; मंत्रि‍पदावर विखेंनी स्पष्टच सांगितलं

महायुती सरकारमध्ये अनेक जण पहिल्यांदाच मंत्री झालेल्यांना वजनदार खाते मिळाले आहे. अनेकावेळा मंत्री राहिलेल्यांपेक्षा नवख्या मंत्र्यांना मोठे बजेट असलेले खाते मिळाले आहे. या खातेवाटपात भाजपाचाच वरचष्मा राहिला. अनेक दिग्गजांना धक्का बसला तर काही नवख्या मंत्र्यांना वजनदार खाती मिळाली. भाजपाचाच विचार केला तर राधाकृ्ष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे, गिरीश महाजन यांना मोठा धक्का बसला आहे. एकप्रकारे या नेत्यांचं राजकीय वजन कमी करण्याचाच प्रयत्न या माध्यमातूम झाल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.

विखेंचे डिमोशन…

मंत्रमंडळाचा विस्तार झाला मात्र यामध्ये पूर्वी ज्या मंत्र्याकडे जी खाते होती ती यंदाच्या खातेवाटपामध्ये कायम ठेवण्यात आली नाही. यामध्ये मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री या पदानंतर सर्वाधिक महत्वाचे असलेलं खातं म्हणजे महसूल खातं होय. मात्र नव्या सरकारमध्ये महसूल मंत्रिपदी बावनकुळे यांची वर्णी लावत भाजपकडून विखे पाटील यांना झटका दिल्याचे बोलले जात आहे. विखे यांच्याकडे जलसंपदा (गोदावरी, कृष्णा विकास महामंडळ) देण्यात आले आहे.

दादांना टोला, शरद पवारांचं कौतुक; राजीनाम्याचा उल्लेख करत भुजबळ म्हणाले, मी कशाला..

मंत्रिमंडळातील तिसऱ्या क्रमांकाच्या महसूल मंत्रिपदावरून विखे यांना तुलनेने कमी महत्त्वाचे समजले जाणाऱ्या जलसंपदा खात्याचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. ते खातेही विभागण्यात आले आहे. दरम्यान महसूल खातं यापूर्वी काँग्रेसमधील बाळासाहेब थोरात यांच्याकडे देखील होते. त्यानंतर राज्यात सत्तेत आलेल्या युती सरकारच्या काळात विखे यांच्याकडे या खात्याचा कारभार होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube