संथ सुरुवातीनंतर वेग वाढला; अहिल्यानगरमध्ये दुपारी तीनपर्यंत ४७.८५ टक्के मतदान

संथ सुरुवातीनंतर वेग वाढला; अहिल्यानगरमध्ये दुपारी तीनपर्यंत ४७.८५ टक्के मतदान

Maharashtra Election 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातही दुपारनंतर मतदानाने वेग घेतला आहे. सकाळच्या टप्प्यात मतदानाचा वेग संथ होता. दुपारच्या मतदानाने वेग घेतला होता. नागरिकांनी घरातून बाहेर पडत मतदान केंद्रांची वाट धरली. त्यामुळे मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारी तीन वाजेपर्यंत जिल्ह्यातील 12 मतदारसंघांत सरासरी 47.85 टक्के मतदान झाले आहे. याआधी दुपारी एक वाजेपर्यंत 32.90 टक्के मतदान झाले होते. तर राज्यात दुपारी तीन वाजेपर्यंत सरासरी 45.53 टक्के इतके मतदान झाले आहे.

निवडणुकीच्या धामधुमीत अहिल्यानगरमध्ये मोठा शस्त्रसाठा सापडला; जिवंत काडतुसं, रायफलींसह 9 काश्मिरी तरूणांना अटक

राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यातील 288 मतदारसंघात मतदान होत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात मतदानासाठी निवडणूक आयोगाने जय्यत तयारी केली. मतदान केंद्रांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच मतदानासाठी येणाऱ्या नागरिकांना कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे.

सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या वेळेला मतदान केंद्रांवर फारशी गर्दी नव्हती. रोजच्या कामाला सुरुवात करण्याआधी नागरिक मतदान केंद्र गाठत होते. त्यामुळे मतदान केंद्रांवर तुरळक गर्दी दिसत होती. सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 5.96 टक्के मतदान झाले होते. त्यानंतर पुढील दोन तासांत म्हणजेच सकाळी 11 वाजेपर्यंत 18.24 टक्के मतदान झाले होते. यानंतर मात्र मतदानाचा टक्का वेगाने वाढू लागला. मतदान केंद्रांवर गर्दीही दिसू लागली. मतदान केंद्रांच्या बाहेर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.

मतदान केंद्रांवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतदारांना त्रास होऊ नये याचीही काळजी घेण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र शांततेत मतदान होताना दिसत आहे. जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ मतदान प्रक्रियेचा सातत्याने आढावा घेत आहे. जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे. दुपारी एक ते दीड वाजेपर्यंत 32.90 टक्के मतदान जिल्ह्यात झाले होते. यानंतर दुपारच्या उन्हातही लोकांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे दुपारी तीन वाजेपर्यंत अहिल्यानगर जिल्ह्यात सरासरी 47.85 टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले.

अहिल्यानगर जिल्ह्यात महायुती अन् मविआत बंडखोरी! विखेंच्या विरोधात राजेंद्र पिपाडांची माघार नाहीच 

यामध्ये अहिल्यानगर शहर 44.17 टक्के, अकोले 53.19, कर्जत-जामखेड 51.16 टक्के, कोपरगाव 52.39 टक्के, नेवासा 54.74 टक्के, पारनेर 46.91 टक्के, राहुरी 45.90 टक्के, संगमनेर 50.60 टक्के, शेवगाव 42.63 टक्के, शिर्डी 53.87 टक्के, श्रीगोंदा 40.13 टक्के आणि श्रीरामपूर मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 42.32 टक्के इतके मतदान झाले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube