प्रेमविवाह केला पण, दीड वर्षातच होत्याचं नव्हतं.. विवाहितेचा केला भयंकर अंत..

प्रेमविवाह केला पण, दीड वर्षातच होत्याचं नव्हतं.. विवाहितेचा केला भयंकर अंत..

Ahilyanagar News : नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातून एक धक्कादायक घटना घडली आहे. पाथर्डी तालुक्यातील वडगाव येथील अनिकेत धनवे व उल्हासनगर येथे राहणारी कीर्ती धनवे यांचा दीड वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. आयुष्याची सुंदर स्वप्ने पाहणाऱ्या कीर्तीचा चक्क तिच्याच पतीने घात केला. कीर्तीला सासरच्या लोकांनी इतर साथीदारांच्या मदतीने शेतातील छपरामध्ये स्वयंपाक करीत असताना जाळून भयावह अंत केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, या प्रकरणी पाथर्डी पोलिसांत विवाहितेच्या वडिलांनी फिर्याद दाखल केली आहे.

अवघ्या दीड वर्षांच्या संसाराची राखरांगोळी

सुमारे दीड वर्षांपूर्वी वडगाव येथील अनिकेत धनवे व उल्हासनगर येथे राहणारी कीर्ती धनवे यांचा प्रेमविवाह झाला होता. अनिकेत व कीर्ती यांचे लग्नाच्या पूर्वीपासून जवळचे नातेसंबंध होते. प्रेमविवाहानंतर त्यांचे लग्न लावून दिले. लग्न झाले मात्र अनिकेतच्या घरच्यांनी तिला आपलं सून म्हणून मान्य केलं नव्हतं. अखेर सासरच्या लोकांच्या मनात असलेली खदखद बाहेर आली. विशेष म्हणजे ज्याच्यावर प्रेम केलं त्याच्यावर विश्वास ठेवून आई बापाचं घर सोडलं त्यानेच तिच्या आयुष्याची दोर अशी भयावह कापली.

मोठी बातमी! रणवीर अल्लाहबादिया-समय रैनासह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

आयुष्याची साथ देणाराच ठरला वैरी 

कीर्ती व अनिकेत यांच्यामध्ये प्रेम झाले व प्रेमाचे रूपांतर लग्नामध्ये झाले. घरच्यांचा विरोध असतानाही कीर्तीने अनिकेतची साथ देण्याचे ठरवले. दोघांनी लग्न केलं. विरोध असले तरी काही नाती कालांतराने जुळून येतात मात्र हे नातं अवघ्या दीड वर्षात संपुष्टात आले. 11 तारखेला किर्ती शेतातील छप्परामध्ये स्वयंपाक करीत होती, घरामध्ये स्वयंपाक करत असताना पती अनिकेत धनवे, सासू करुणा धनवे आणि सासरा अंकुश धनवे यांनी इतर लोकांच्या मदतीने जाळून मारले. याप्रकरणी फिर्याद विवाहितेचे वडील संतोष विठ्ठल अंग्रख यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास पाथर्डी पोलीस करत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube