‘टायगर अभी जिंदा हैं…’; सुजय विखेंनी पुन्हा निलेश लंकेंना डिवचलं

मी अजून संपलेलो नाही, टायगर अभी जिंदा है, अशी वादळे येतात आणि जातात, असं म्हणत विखेंनी खासदार लंकेंना इशारा दिला.

  • Written By: Published:
Sujay Vikhe

Sujay Vikhe Patil on Nilesh Lanke : विधानसभा निवडणुका (Vidhansabha Election) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीकेच्या फैरी झडत आहेत. आता भाजप नेते खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मी अजून संपलेलो नाही, टायगर अभी जिंदा है, अशी वादळे येतात आणि जातात, असं म्हणत विखेंनी खासदार लंकेंना इशारा दिला.

रतन टाटांचा खास मित्र कोण? वयानं लहान कामात मात्र वाघ; जाणून घ्या, पुणेकर शांतनुचा किस्सा.. 

नगर तालुक्यातील पिंपळगाव उज्जैन येथील कार्यक्रमात बोलताना सुजय विखे पाटील यांनी खासदार निलेश लंकेवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, मी कुठेही गेलेलो नाही. मी कुठेही लपलेलो नाही. टायगर अभी जिंदा है. त्यामुळं तुम्ही काळजी करायचं काहीही कारण नाही. असे वादळ येत असतात आणि जात असतात, असं विखे म्हणाले.

स्व. बाळासाहेब विखे पाटील यांनाही पराभव स्वीकारावा लागला. मी तर त्यांच्या 10 टक्केही नव्हतो. परिस्थिती बदलली, माझा पराभव झाला. पण परिस्थिती बदलत असते, मात्र, आपण पुन्हा एकदा तेवढ्याच ताकदीने आणि तेवढ्याच उमेदीने सर्वसामान्य जनतेचे काम करत राहणार आहेत, असं विखेंनी म्हटलं.

Stree 2 : थिएटरला पछाडल्यानंतर आता ओटीटीवर येणार श्रद्धाचा ‘स्त्री 2’, कधी रिलीज होणार? 

पुढं ते म्हणाले, तुम्ही माझे भाषण कधीही ऐका आणि निवडून आलेल्या खासदाराचे भाषण ऐका. तुम्हाला लगेच फरका जाणवेल की, निवडून आलेले खासदार भाषणात कधीही जनमाणसांच्या जीवनात परिवर्तन व्हावं, असं कधीच बोलत नाही. फक्त हा बोगस आहे, याला **, तो हरामखोर फक्त एवढचं त्यांच्या भाषणात ऐकायला मिळतं. मग तुम्ही (जनता) मतदान कसे देता? आता मी आज याठिकाणी आलो आहे, तुमच्यामध्ये आलोय. पण या ठिकाणी जमलेल्या माणसातील अर्ध्या लोकानी माझा कार्यक्रम केला. मात्र, मी तुम्हाला सांगतो, माझा कार्यक्रम झाला नाही तर तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीचा कार्यक्रम केला, अशी खंतही खासदार सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केली.

follow us