अकोले बाजार समिती निवडणुकीत चुरस वाढली…

अकोले बाजार समिती निवडणुकीत चुरस वाढली…

Akole Bajar Samiti Election : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Akole Market Committee)प्रचाराला आता ऐन उन्हात जोर आला आहे. येत्या 30 एप्रिलला मतदान होणार आहे. त्याआधीच भाजप (BJP)प्रणित शेतकरी विकास मंडळाने (Farmers Development Board)तीन जागा बिनविरोध जिंकून विजयाचे रणशिंग फुंकले आहे. आज अगस्ती ऋषींच्या आश्रमात (Agasti Rishi Ashram)जाऊन नारळ वाढवत धूमधडाक्यात प्रचाराला सुरुवात केली आहे.

युद्धात सुदान उद्ध्वस्त, 400 जणांचा मृत्यू; अद्यापही संघर्ष कायम

शेतकऱ्यांची अत्यंत जिव्हाळ्याची संस्था असलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या शेतकरी समृद्धी मंडळाला तीन जागांवर उमेदवार न देता आल्याने शेतकरी विकास मंडळाच्या तीन जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत.

आता 34 उमेदवार रिंगणार उरले असून, माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या शेतकरी समृद्धी मंडळापुढे तगडे उमेदवार देऊन आव्हान दिले आहे.

आज अगस्ती ऋषींच्या आश्रमात नारळ वाढवून त्यांनी विजयाचा निर्धार केला आहे. यावेळी यशवंत आभाळे, शिवाजी धुमाळ व माजी आमदार वैभव पिचड यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत पहिल्याच दिवशी प्रचारात आघाडी घेतल्याचे दाखवून दिले. याप्रसंगी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व उमेदवार उपस्थित होते. दरम्यान विरोधक देखील आता कसे प्रत्युत्तर देतात हे पाहणं औत्सुक्याचे ठरत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube