APMC Election : संगमनेरमध्ये थोरातांनी विखेंचा प्रवेश रोखला ! विखेंच्या पॅनलचा दारुण पराभव

APMC Election : संगमनेरमध्ये थोरातांनी विखेंचा प्रवेश रोखला ! विखेंच्या पॅनलचा दारुण पराभव

Balasaheb Thorat vs Radhakrishna Vikhe : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे (APMC Election) निकाल हाती आले आहेत. या निवडणुकीत माजी महसूलमंत्री मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Thorat) यांच्या पॅनलचा तर सुपडा साफ झाला आहे. या पॅनलचा एकही उमेदवार निवडून आला नाही.

या निवडणुकीत काँग्रेस नेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या गटाने सर्वच्या सर्व 18 जागा जिंकल्या. विरोधी भारतीय जनता पार्टीच्या गटाला एकही जागा जिंकता आली नाही. समिती निवडणुकीतील हा पराभव भाजपसाठी नामुष्कीजनकच ठरला आहे.

Maharashtra APMC Election Result LIVE updates : राज्याच्या कल कोणाकडे? कोण राखणार सत्ता

नगर जिल्ह्यात माजी मंत्री बाळासाहेब थोरात विरुद्ध राधाकृष्ण विखे पाटील संघर्ष सर्वांनाच माहित आहे. जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकांतही हा संघर्ष दिसून आला. संगमनेर बाजार समितीकडे राजकीय जाणकरांचे विशेष लक्ष होते. बाजार समितीच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील राजकारणात प्रवेश करण्याचा विखे यांचा प्रयत्न होता. मात्र, थोरात यांनी हा विखेंचा प्रयत्न हाणून पाडला आहे, असेच म्हणावे लागेल.

संगमनेरमध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात विरुद्ध राधाकृष्ण विखे पाटील असा संघर्ष पहायला मिळाला. या संघर्षामध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात गटाने पुन्हा एकदा मार्केट कमिटीवर आपली सत्ता प्रस्थापित केली आहे. तर राधाकृष्ण विखे पाटील गटाचा पराभव झाला.

इस्लामपुरात राष्ट्रवादीच

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचेच वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले आहे. या निवडणुकीत 18 पैकी 17 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे.

पारनेरमध्ये Sujay Vikhe गटाचा धुव्वा, लंके-औटी गटाने सर्व जागा जिंकल्या

इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतमोजणीला सकाळी आठ पासून सुरवात झाली होती. मतमोजणी शांततेत पार पडली. ही मतमोजणी इस्लामपूर पंचायत समितीच्या पाठीमागील शेतकरी बचत धाम मध्ये सुरु आहे. एकूण 13 टेबलांवर मतमोजणी सुरु असल्याने मतमोजणी जलद गतीने पार पडली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube