“तोडगा निघाला तर ठीक नाहीतर मैत्रीपूर्ण लढती”, महाजनांनी सांगितला मनपा निवडणुकीचा प्लॅन!

Girish Mahajan on Local Body Elections : राज्यात आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे (Maharashtra Local Body Elections) पडघम वाजू लागले आहेत. या निवडणुकीची तयारी महाविकास आघाडी (MVA) आणि महायुतीकडून केली जात आहे. महायुती एकत्रितपणे या निवडणुका लढणार असल्याचे वरिष्ठ नेते सांगत असले तरी अद्याप बऱ्याच घडामोडी बाकी आहेत. यातच आता जलसंपदा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या वक्तव्याने महायुतीच्या स्ट्रॅटेजीचा अंदाज येऊ लागला आहे. तोडगा निघाला तर मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात असे महाजन म्हणाले आहेत.
महाजन म्हणाले, जागावाटपाचा निकष काय असेल याबाबत अजून काही निश्चित नाही. ज्या जागा पक्षाच्या चिन्हावर लढवल्या गेल्या, ज्या सिटिंग जागा आमच्या आहेत. त्या जागा आमच्याच राहणार आहेत. जर हा मुद्दा गुंतागुंतीचा होत असेल तर चर्चा करुन त्यावर मार्ग काढण्यात येईल. महायुतीच्या माध्यमातूनच आम्ही निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. फार काही तोडगा निघाला नाही तर मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात.
गिरीश महाजन खरंच संकटमोचक, आपत्तीत मार्ग काढतात; बडगुजरांकडून भाषणातच उल्लेख
मी पक्षाचा साधा कार्यकर्ता
यानंतर गिरीश महाजन यांनी शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार टीका केली. मागील काही दिवसांपासून दोन्ही नेत्यांत आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी खडसे यांनी मी भाजपात असताना गिरीश महाजन माझे सामान्य कार्यकर्ते होते असे म्हणत टोला लगावला होता. त्यांच्या या वक्तव्यावर मंत्री महाजन यांनी जोरदार पलटवार केला. त्यांचं बरोबर आहे. मी साधा कार्यकर्ताच आहे. लहानपणापासूनच मी राष्ट्रीय स्वयंसेवक संंघाचा स्वयंसेवक आहे. खडसे साहेबांना म्हणा मी बाल स्वयंसेवक होतो. मी भाजप युवा मोर्चाचा कार्यकर्ता होतो. हे 1990 साली आले. मी शाळेत होतो तेव्हापासून शाखेत जात होतो. मी त्यांना कार्यकर्ता नाहीतर नेताच म्हणणार असे प्रत्युत्तर महाजन यांनी एकनाथ खडसे यांना दिले.
राज्य सरकारमध्ये शिंदे गटातील नेते आणि मंत्री अजित पवार यांच्यावर नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तशा बातम्याही आल्या आहेत. यावर गिरीश महाजन यांनी भाष्य केलं. कुठेही नाराजी नाही. काल सर्वांची बैठक झाली. थोडीफार कुरबुर असते. पक्षात असते मित्रपक्षातही असते. पण नाराजी माध्यमांतून दिसते. आमच्यात एकमत आहे. या एकमतानेच आम्ही आगामी निवडणुका लढू असा विश्वास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.
दादा भुसे आणि गिरीश महाजन यांना दिलासा! छगन भुजबळांची मोठी घोषणा, नाशिकचं पालकमंत्रीपद