Video : पालिका निवडणुकांचे निर्देश निघताच फडणवीस लागले कामाला; सांगितला युतीचा फॉर्मुला

Devendra Fadnavis on Maharashtra Local Body Elections : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला चार महिन्यांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अधिसूचना देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिले आहेत. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका लवकर घेण्यास सांगण्यात आले आहे. न्यायालयाच्या या आदेशानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रितच लढेल अशी घोषणाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.
अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी येथे आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह राज्य सरकारमधील मंत्री, राज्यमंत्री उपस्थित होते. बैठकीनंतर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी बैठकीतील निर्णयांची माहिती दिली. यावेळी पत्रकारांनी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत दिलेल्या निकालावर विचारले. यावर फडणवीस म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुत एकत्रित असेल. स्थानिक पातळीवर एखाद्या ठिकाणी वेगळा निर्णय होऊ शकतो पण एकूणच या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार आहे.
2022 च्या आधीची परिस्थिती कायम
ओबीसी आरक्षणाबाबत 2022 च्या (OBC Reservation) आधीची जी परिस्थिती होती ती परिस्थिती कायम ठेवावी. याचिकाकर्त्यांनी म्हटले होते की 2022 मध्ये अहवाल आला त्यामध्ये ओबीसींच्या जागा कमी करण्यात आल्या. त्यामुळे न्यायालयाने 2022 पूर्वीची परिस्थिती कायम ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ओबीसींच्या घटलेल्या जागा देखील पुन्हा बहाल होणार आहेत असा याचा अर्थ होतो.
अहिल्यानगरसाठी मेडिकल कॉलेज
अहिल्यादेवी होळकरांच्या जीवनावर चित्रपट काढला जाणार आहे. अहिल्यानगरसाठी मेडिकल कॉलेज देण्यात येणार आहे. चौंडीचा तिर्थस्थळ म्हणून विकास केला जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. आज चौंडी येथे मंत्रिमंडळ बैठक झाली. चोंडी येथे 681 कोटींचा आराखड्याला मान्यता दिली आहे. अखिल भारतीय तीर्थस्थळ म्हणून त्यांना विकसित करण्यात येणार आहे. तुळजाभवानी मंदिर 1862 कोटी, त्र्यंबकेश्वर221 कोटी, महालक्ष्मी मंदिर 1445, माहूरगड 829 कोटी रुपये असे एकूण 5530 कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजूरी देण्यात आली आहे.
ब्रेकिंग! अहिल्यानगरसाठी मेडिकल कॉलेज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चौंडीतून मोठी घोषणा
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय हॉस्पिटल, असं नाव या मेडिकल कॉलेजला देण्यात येणार आहे. यासोबत अहिल्यानगरमध्ये खास मुलींकरिता स्वतंत्र आयटीआय देखील तयार करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. महिला सक्षमीकरणाकरिता आदिशक्ती अभियान राबविण्याचं ठरवलं आहे. या अभियानाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जागृती केली जाणार असल्याचं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.